गर्लफ्रेंड शोधून द्या; लाखो रुपये मिळवा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 February 2020

तो स्वतः मोकळ्या विचारांचा आणि मजेशीर व्यक्ती असल्याचं तो सांगतो. त्यामुळे त्याला जोडीदार देखील तशीच पाहिजे असल्याचं त्याने सांगितलं आहे. 

अमेरिकेतील एका उद्योजकाला गर्लफ्रेंड हवी आहे. गर्लफ्रेंड शोधण्यासाठी त्याने चक्क बक्षीस ठ्वल आहे. जेफ गेबहार्ट असं या उद्योगपतीचे नाव असून त्याने स्वतःसाठी गर्लफ्रेंड शोधण्यासाठी एक डेटिंग वेबसाईटचं काढली आहे. याद्वारे जो जेफला गर्लफ्रेंड शोधून देईल त्याला २५ हजार डॉलर म्हणजेच १७ लाख ९२ हजार रुपये देण्यात येणार आहे. गेबहार्टचे वय सध्या ४७ वर्षे असून गर्लफ्रेंड शोधण्यासाठी तो विविध प्रयत्न करताना दिसत आहे. 

आपल्याला चांगल्या वाईट गुणांचा स्वीकार करणारी मुलगी गर्लफ्रेंड म्हणून हवी आहे. त्यासाठी त्याने डेट जेफ जी (DateJeffG.com) नावाची डेटिंग वेबसाईट सुरु केली. यामध्ये इच्छुकांनी सर्वात आधी वेबसाईटवर आपला अर्ज दाखल करायचा आहे. त्यानंतर एक सर्वेक्षणाद्वारे पुढे प्रक्रिया होणार आहे. हे सर्वेक्षण एका मनोवैज्ञानिकाने तयार केले आहे. त्यानुसार मुलगी न पाहता आपलं जमेल की नाही, हा अंदाज घेणं शक्य होणार आहे. 

जेफयच्या मुलीबाबतच्या अपेक्षा अगदी सर्वसामान्य आहेत. त्यामुळे त्याला मुलगी भेटणार की नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जेफला त्याला सपोर्ट करणारी, मनमिळावू, सकारात्मक विचारांची तसेच सर्वांशी प्रेमाने वागणारी मुलगी गर्लफ्रेंड म्हणून पाहिजेय. तो स्वतः मोकळ्या विचारांचा आणि मजेशीर व्यक्ती असल्याचं तो सांगतो. त्यामुळे त्याला जोडीदार देखील तशीच पाहिजे असल्याचं त्याने सांगितलं आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News