एकेकाळी फूटपाथवर दिवस काढणाऱ्या निलेश साबळेचं हे स्वप्न पूर्ण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 February 2020

अभिनेता डॉ निलेश साबळे यानी नुकताच आपल्या हक्काच्या अशा स्वतःच्या घरात प्रवेश केला.

मुंबई : मुंबईसारख्या मायानगरीत स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाला वाटते. मात्र मुंबईसारख्या ह्या जादुई महानगरीत स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणे शक्य असते मात्र प्रत्यक्षात ते स्वप्न पूर्ण करण्यास अनेकांची कसोटी लागते.

यामध्ये "चला हवा येऊ दे" फेम डॉ निलेश साबळेदेखील अपवाद नाही असे म्हणावे लागेल मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तब्बल १२ वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या निलेश साबळेला मुंबईसारख्या शहरामध्ये स्वतःचे घर घेण्याचा योग्य नुकताच प्रत्यक्षात आला. म्हणजेच जवळपास एका तपापेक्षा जास्त कष्ट केलेल्याचे  चीज झाले असे म्हणावे लागेल.

अभिनेता डॉ निलेश साबळे यानी नुकताच आपल्या हक्काच्या अशा स्वतःच्या घरात प्रवेश केला. निलेश साबळे यांच्या गृहप्रवेशाचा फोटो नुकताच अभिनेता कुशल बद्रिके यांनी ट्विट केला. ह्या गृह प्रवेशाला मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रितील अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

"चला हवा येऊ द्या" ही निलेश साबळेसाठी मालिका नसून एकप्रकारे कुटुंबच आहे असे म्हणावे लागेल.ह्या गृहप्रवेशाला अभिनेता भारत गणेशपुरे,मानसी नाईक,कुशल बद्रिके,भाउ कदम या सर्वांनी सहकुटुंब हजेरी लावली त्यामुळे निलेश  साबळे देखील चांगलाच खुश होता.त्यामुळे सोन्याच्या ह्या जादुई महानगरीत आणखी एकाचे स्वतःच्या मालकी हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले.       

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News