अखेर नेहा कक्कर आणि आदित्यने केला लग्नाबाबत मोठा खुलासा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020
  • एका मुलाखतीमध्ये नेहा कक्करने खुलासा केला.
  • आदित्य आणि तिच्या लगनबद्दल ज्यावेळी विचारण्यात आले, तेव्हा ती म्हणाली की, आदित्य खूप चांगला मुलगा आहे. त्याचा स्वभाव देखील खूप छान आहे.

गेल्या काही दिवसांपासून इंडियन आयडल ११ च्या सेटवर अनेक गोष्टी घडत आहेत. शो मध्ये नेहा-आदित्य यांच्या लग्नाबाबत चर्चा सुरु होत्या. आदित्य आणि नेहाचे आई वडील देखील यासाठी सेटवर आले होते. शो दरम्यानच दोघांच्या लग्नाचे विधी देखील दाखविण्यात आले होते. तर हे लग्न झालंय की नाही? याबाबत खुद्द नेहा कक्कर आणि आदित्यने खुलासा केला आहे.  

एका मुलाखतीमध्ये नेहा कक्करने खुलासा केला. आदित्य आणि तिच्या लगनबद्दल ज्यावेळी विचारण्यात आले, तेव्हा ती म्हणाली की, आदित्य खूप चांगला मुलगा आहे. त्याचा स्वभाव देखील खूप छान आहे. पण मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की, माझा हा जवळचा मित्र लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. आदित्य त्याच्या गर्लफ्रेंडसोबत यावर्षी लग्न करणार आहे. त्यांची जोडी अशीच सोबत राहावी, यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते, असं देखील नेहा म्हणाली. 

नुकताच इंडियन आयडलच्या सेटवरील नेहा-आदित्यच्या वरमाला घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर शो च्या टीआरपीने मोठा जोर धरला होता. याबाबत आदित्यने देखील स्पष्टीकरण दिले आहे. एका मुलाखतीदरम्यान तो म्हणाला, ज्यावेळी मी माझ्या आयुष्यातला एवढा मोठा निर्णय घेणार असेल तर मो तो लपवणार नाही. कारण तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा निर्णय आहे.

शो मध्ये जे काही झालं ते सर्व मस्तीमध्ये सुरु होते. मात्र लोकांनी त्या सर्व गोष्टी खूपच गंभीरतेने घेतल्या. याबाबत कोणीही खरं जाणून घेण्यासाठी आमच्याकडे आले नाही, असं म्हणत आदित्यने मीडियावर देखील नाराजी व्यक्त केली. हे सर्व शोच्या मेकर्सने आम्हाला करण्यासाठी सांगितलं होते, त्याप्रमाणे आम्ही केलं. 

त्यामुळे आदित्य आणि नेहाचे लग्न म्हणजे  केवळ शो चा टीआरपी वाढविण्यासाठी केला ऍक्ट असल्याचं त्या दोघांनीही स्पष्ट केले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News