अखेर JNU च्या माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 14 September 2020
  • सीएए आणि एनआरसीविरोधात देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील हिंसाचाराबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.
  • फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दंगलप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक केली आहे.

नवी दिल्ली :- सीएए आणि एनआरसीविरोधात देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील हिंसाचाराबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दंगलप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक केली आहे. बेकायदा कृत्यरोधी कायद्यांतर्गत (यू.ए.पी.ए) उमर खालिदला अटक करण्यात आली आहे. सुत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी उमर खालिदला चौकशीसाठी बोलवले होते. रविवारी लोदी कॉलनीमध्ये त्याला विशेष सेल कार्यालयात तपासासाठी सहभागी होण्यास सांगितले. त्यानंतर रविवारी तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर उमर खालिदला दिल्ली पोलिसांनी अटक केली.

एका पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आधी ३१ जुलै रोजी उमर खालिद याची चौकशी केली होती. त्यावेळी त्याचा स्मार्टफोन जप्त करण्यात आला होता. रविवारी उमर खालिद चौकशीसाठी दुपारी एक वाजता पोहचला होता. ११ तासांच्या चौकशीनंतर रविवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. पुढील काही दिवसांत दिल्ली पोलिस उमर खालिदच्या विरोधात चार्जशीट दाखल करु शकते. आज, सोमवारी खालिदला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

उमर खालिदच्या अटकेनंतर ‘युनायटेड अगेन्स्ट हेट ग्रुप’ने एक निवेदन जारी केले आहे. ‘११ तासांच्या चौकशीनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उमर खालिदला दिल्ली दंगल प्रकरणातील सूत्रधार म्हणून अटक केली आहे. दिल्ली पोलिस हिंसाचाराच्या तपासाच्या नावाखाली हिंसक आंदोलनांना चालना दे आहेत’, असे युनायटेड अटेन्स्ट हेटने म्हटले आहे.

काहीही केले तरी सीएए आणि एनआरसी विरूद्ध लढा सुरूच राहणार आहे. त्याला जास्तीत जास्त सुरक्षा प्रदान करणे हे आमचे प्राधान्य आहे आणि दिल्ली पोलिसांनी त्याच्या सुरक्षेची पूरेपूर काळजी घ्यावी, असे युनायटेड अगेन्स्ट हेटने म्हटले.

कोण आहे उमर खालिद?

खलिदचा परिवार ३ दशकांपूर्वी महाराष्ट्रातील अमरावतीमधून दिल्ली येथे स्थानिक झाला. उमर खलिद हा झाकिरनगर परिसरात राहायचा. त्याचे वडील हे उर्दु मासिक चालवायचे. जेएनयूतील समाजशास्त्र विभागातून उमर खालिदने इतिहास या विषयात एमए आणि एम- फिल केले आहे. सध्या तो जेएनयूतून पीएचडी करत आहे. २०१६ मध्ये संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरू याच्यासंदर्भात विद्यापीठ परिसरात झालेल्या कार्यक्रमात देशविरोधी नारे देण्यात आल्याचे समोर आले. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अन्य मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासूनच देशभरात उमर खालिद चर्चेचा विषय ठरला.

उमर खलिद आणि वाद?

उमर खलिद याने मोदी सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर वेळोवेळी बोचरी टीका केली आहे. तसेच जेएनयूत हिंदू देवी- देवतांचे आक्षेपाऱ्ह चित्र लावून तेढ निर्माण केल्याचा आरोप खलिदवर झाला होता. तसेच अफझल गुरुला फाशी देण्यात आली त्या दिवशी जेएनयूत शोकसभा झाली होती. यात ही खलिद सहभागी झाल्याचे सांगितले जाते. या शिवाय खलिदने वेळोवेळी काश्मीरला स्वातंत्र्य देण्याची मागणी केली आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News