अंतिम वर्षांच्या परीक्षांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात निर्णय होण्याची शक्यता 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 August 2020
  • विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा कोरोना काळात  घेतल्या जाव्यात की नाही या संदर्भात सध्या विद्यार्थी आणि यूजीसी या दोघांमध्ये संघर्ष सुरु आहे.
  • विद्यार्थी आणि यूजीसी या दोघांमधील संघर्षाच्या मुद्यावर आज २४ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात निर्णय होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली :- विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा कोरोना काळात  घेतल्या जाव्यात की नाही या संदर्भात सध्या विद्यार्थी आणि यूजीसी या दोघांमध्ये संघर्ष सुरु आहे. विद्यार्थी आणि यूजीसी या दोघांमधील संघर्षाच्या मुद्यावर आज २४ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात निर्णय होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूचा प्राधुरभाव वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ नये याकरता महाराष्ट्र समवेत इतर तेरा राज्य सरकारांनी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार नाहीत असे जाहीर केले होते. परीक्षा होणार नसल्या तरीही मागील परीक्षेत मिळालेल्या सरासरी गुणांच्या आधारावर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निकाल दिला जाईल असे राज्य सरकारांनी म्हंटले होते. परंतु यूजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोग यांनी परीक्षा न घेता निकाल देण्याला विरोध करून अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ३० सप्टेंबर पर्यंत घेण्यात याव्यात असे निर्देश दिले. 

महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यूजीसीला पत्र लिहून राज्य सरकार कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात असमर्थ आहेत असे सांगितले. परंतु असे असले तरी यूजीसी परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम राहिली. तेव्हा विविध राज्यातील ३१ विद्यार्थ्यांनी तसेच युवासेनेने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शन खाली सुप्रीम कोर्टात यूजीसीच्या परीक्षा घेण्याच्या निर्णया विरोधात याचिका दाखल केली. १४ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने विद्यार्थी आणि युवासेनेची बाजू ऐकून घेतली. कोरोना काळात परीक्षा घेतल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल तसेच त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण होईल असा युक्तिवाद विद्यार्थींच्या वकिलांकडून करण्यात आला, तसेच देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना राज्य सरकारांना विद्यार्थ्यांच्या परीक्षा संबंधी निर्णय घेण्याचे स्वतंत्र द्यावे असा युक्तिवाद  युवासेनेच्या वकिलांकडून करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी १८ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने यूजीसीची बाजू ऐकून घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यांचे भविष्य सांभाळणे हाच परीक्षा घेण्या मागचा उद्देश आहे असा युक्तिवाद यूजीसी कडून करण्यात आला.  १८ ऑगस्टच्या सुनावणी नंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला. परंतु आज सुप्रीम कोर्टाकडून विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष सध्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लागले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News