'या' तारखेपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरु होणार; प्रॉक्टर्ड पद्धतीमुळे कॉपी करणे अशक्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 4 September 2020

प्रॉक्टर्ड पद्धतीचा वापर करुन विद्यार्थ्यांना घर बसल्या परीक्षा देता येतील असे बहुतांश कुलगुरुंनी मत मांडले. यंदा बहुपर्यायी प्रश्नपत्रिका पॉटर्न राबण्याचा विचार कुलगुरुंनी राज्यपलांकडे व्यक्त केली. यावर सर्वांनचे एकमत झाले.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा आयोजनासंदर्भात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक संपन्न झाली. यावेळी परीक्षा घेण्यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना राज्यपालांनी कुलगुरूंना केल्या. कोरोना काळात विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देता येतील का? असा प्रश्न उपस्थित केला. यावर कुलगुरूंनी चर्चा केली. प्रॉक्टर्ड पद्धतीचा वापर करुन विद्यार्थ्यांना घर बसल्या परीक्षा देता येतील असे बहुतांश कुलगुरुंनी मत मांडले. यंदा बहुपर्यायी प्रश्नपत्रिका पॉटर्न राबण्याचा विचार कुलगुरुंनी राज्यपलांकडे व्यक्त केली. यावर सर्वांनचे एकमत झाले. बैठकीला तेरा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अपर मुख्य सचिव राजीव जलोटा, परीक्षा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पळशीकर उपस्थिती होते. 

'या' तारखेला परीक्षा सुरु होणार

विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार अमरावती विद्यापीठाने 15 सप्टेंबरपासून परीक्षा घेण्याचे सुतोबाच केले. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा येत्या 15 सप्टेंबरपासून सुरू होतील आणि 31 सप्टेंबर पर्यंत परीक्षा प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती उदय सावंत यांनी दिली. 

काय म्हणाले राज्यपाल... 

परीक्षा सल्लागार समितीने आपला अहवाल व्यवस्थापन परिषद आणि परीक्षा मंडळापुढे ठेवावा आणि यावर योग्य तो निर्णय घेऊन दोन दिवसात शासनाला कळवावा. मंगळवारी राज्य आपत्कालीन प्राधिकरणाची बैठक आयोजित करुन बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपस्थित राहण्याची विनंती करावी. समितीने सुचवलेल्या परीक्षा पद्धतीपैकी एक पर्याय व्यवस्थापन परिषद आणि परीक्षा मंडळाने निवडावा असे राज्यपालांनी सांगितले. 

कशी आहे प्रॉक्टर्ड परीक्षा पद्धत?

आयआयटी मुंबई, मद्रास, दिल्ली अशा नामवंत विद्यापीठांनी प्रॉक्टर्ड पद्धतीचा अवलंब करुन यशस्वीरित्या परीक्षा आयोजित केली. त्यात पुणे विद्यापीठाचा समावेश आहे.प्रॉक्टर्ड पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांकडे असलेली संसाधने संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन याद्वारे परीक्षा देता येते. स्क्रीन समोर बसून विद्यार्थी पेपर सोडतो मात्र, विद्यार्थ्यांच्या संशयास्पद  हालचालींवर तंत्रज्ञानाद्वारे बारीक लक्ष ठेवले जाते. विद्यार्थ्यांनी हालचाल केल्यास त्यांना सूचना दिल्या जातात मात्र, या सूचना देऊनही विद्यार्थीची अतिरिक्त हालचाल सुरु राहिल्यास त्यांना परीक्षेतून बाहेर काढले जाते. अशा पद्धतीने पारदर्शक परीक्षा घेतल्या जातात. आधुनिक काळात प्रॉक्टर्ड परीक्षा पद्धतीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. त्यामुळे कॉफी होण्याची शक्यता कमी आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रॉक्टर्ड परीक्षा पद्धत वापरण्याची शिफारस समितीने केली. शिक्षण परिषद आणि परीक्षा मंडळ या शिफारशी स्वीकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News