अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्यात! युवक कॉंग्रेसचे राज्यपालांना साकडे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 July 2020
  • अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी राज भवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेत केली आहे.
  • यावेळी त्यांनी राज्यपालांकडे इतर महत्त्वाच्या मागण्याही केल्या आहेत.

मुंबई :- अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी राज भवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेत केली आहे. यावेळी त्यांनी राज्यपालांकडे इतर महत्त्वाच्या मागण्याही केल्या आहेत.

ऑनलाईन किंवा मिश्र पद्धतीची परीक्षा अथवा ओपन बुक परीक्षा देण्याचा पर्याय गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारी आहे. पुस्तके बघून परीक्षा देण्याचा पर्याय देखील फार व्यवहार्य नाही, कारण बहुतांश विद्यार्थ्यांकडे संदर्भग्रंथ, पाठ्यपुस्तके अथवा नोट्‌स नाहीत. या सर्व परिस्थितीचा सारासार विचार करत बहुतांश राज्यांनी परीक्षा प्रक्रिया राबवण्यास असमर्थता दर्शवली आहे. असे असताना विद्यापीठ अनुदान आयोगाने आपला निर्णय जबरदस्ती लादणे म्हणजे घटनेने आखून दिलेल्या संघराज्यीय चौकटीचा अवमान करण्यासारखे आहे, असे मतही सत्यजीत तांबे यांनी यावेळी मांडले.

मागील चार महिन्यांपासून विद्यापीठ आयोगाने परीक्षांबाबत काहीही स्पष्टता दिली नाही. त्यामुळे विद्यार्थी तणावाखाली आहेत. या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा देत युवक कॉंग्रेस शेवटपर्यंत विद्यार्थ्यांसोबत उभी राहील, अशी ग्वाहीही यावेळी तांबे यांनी दिली. यावेळी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष ब्रिजकिशोर दत्त, सहसचिव रिषिका राका, सरचिटणीस करिना झेविअर आणि विश्‍वजित हप्पे यांचे शिष्टमंडळ तांबे यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्गाच्या हितासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसने काही महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन राज्यपाल कोश्‍यारी यांना दिले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News