अंतिम परीक्षांचा निर्णय आज ? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 July 2020

सीबीएसई, आयसीएसई परीक्षा रद्द केल्याचा दाखला याचिकाकर्त्यांनी दिला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा या इतर स्पर्धेत आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असतात. या परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत ज्ञान प्राप्त करता येत. त्याबरोबर करिअर करण्याचा दृष्टीने या परीक्षा अति महत्त्वाच्या असतात असं आयोगाचं म्हणणं आहे.

अंतिम परीक्षांचा निर्णय आज ? 

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द व्हाव्यात अशी काही राज्यांची आणि विद्यार्थ्यांची मागणी शिक्षणाला घातक असून, परीक्षेचा विचार हा धोरणात्मक असल्याचे प्रतिज्ञापत्र विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्वोच्छ न्यायालयात स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे परीक्षांविना इंटर्नशीप सुरू करण्यास केंद्रीय वैद्यकीय परिषदेने नकार दिला आहे. त्यामुळे देशातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष आजच्या सुनावणीकडे आहे. 

सीबीएसई, आयसीएसईच्या या परीक्षांची तुलना विद्यापीठांच्या परीक्षांशी कधीच होऊ शकत नाही, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सगळ्याचे लक्ष आजच्या सुनावणीकडे लागले आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द व्हाव्यात अशी काही राज्यांची आणि विद्यार्थ्यांची मागणी शिक्षणाला घातक असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. 

अनेक राज्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेणं योग्य नसल्याचं आयोगाला कळवलं होतं. परंतु नव्या नियमावलीनुसार परीक्षा घेणं बंधनकारक असल्याचं आयोगाने स्पष्ट केल्यानंतर अनेक राज्यांनी, विद्यार्थ्यांनी आणि युवा सेनेने परीक्षा रद्द व्हावी म्हणून सर्वाच्छ न्यायालयात धाव घेतली. दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी घेताना न्यायालयाने आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायलाच हव्यात अशी ठाम भूमिका आयोगाने प्रतिज्ञापत्राव्दारे मांडली आहे. 

सीबीएसई, आयसीएसई परीक्षा रद्द केल्याचा दाखला याचिकाकर्त्यांनी दिला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा या इतर स्पर्धेत आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असतात. या परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत ज्ञान प्राप्त करता येत. त्याबरोबर करिअर करण्याचा दृष्टीने या परीक्षा अति महत्त्वाच्या असतात असं आयोगाचं म्हणणं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News