TikTok ला टक्कर देणारं नवं अॅप आलं, जितके व्हिडीओ बनवणार, तितके पैसे मिळणार

यिनबझ टीम
Tuesday, 28 January 2020

सध्या देशात अनेक तरुण आणि तरुणी tiktok मुळे मोठ्या प्रसिध्दीस आले आहेत, इतकच काय तर अनेकांनी त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसेदेखील कमावले आहेत, मात्र या ट्रेंडिंग असलेल्या अॅपला टक्कर देण्यासाठी भारतीय बाजारपेठेत अजून एक अॅप येत आहे, ज्याला byte म्हणून ओळखले जाते.

या अॅपमध्ये एक खास गोष्ट अशी आहे की  काही दिवसांनतर हे अॅप वापरकर्त्यांना रिवेन्यू मिळणार आहे, जेणेकरून त्या वापरकर्त्यांना त्यांच्या वापरानुसार रक्कम मिळणार आहे. 

byte कडून एक ट्विट देखील सादर करण्यात आले आहे. त्यामध्ये य़ा अॅपबद्दल माहिती सांगण्यात आली आहे. त्यांच्या मते हे एक फॅमिलिअर अॅप असणार आहे. tiktok सारखच यावर अनेक छोटे मोठे व्हिडीओ शेअर करता येतील. त्याचबरोबर अनेक तरुणांना आणि तरुणींना आवडणारी फिचर्स यामध्ये अॅड करण्यात आली आहेत. byte हे एक स्वतंत्र अॅप असणार आहे, याचा इतर कोणत्याही अॅपशी संबंध नसणार आहे. अशी घोषणादेखील byte कडून करण्यात आली आहे. 

सध्या हे अॅप भारत सोडून इतर 40 देशांमध्ये वापरले जाते, मात्र भारतात tiktok चा मोठा फॅनफॉलोअर असल्याने byte ला आणखी नव्या फिचरच्या माध्यमातून भारतात लॉंच करण्यात येणार असल्याचे म्हटले जाते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News