तरुणाईच्या हक्कांसाठी लढा

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा-यिनबझ)
Saturday, 14 December 2019

लाखो बेरोजगार तरुणांच्या समस्या सरकार समोर मांडणारा लढवय्या कार्यकर्ता परमेश्वर इंगोले आणि महिला सक्षमीकरणासाठी लढणारी कार्यकर्ती दिव्या पाटील यांनी सकाळ माध्यम समुहाच्या 'यिनबझ'ला भेट दिली. त्यांची मुलाखत उपसंपादक सोनल मंडलिक यांनी घेतली. या मुलाखतीत तरुणाईच्या विविध विषयावर चर्चा झाली.

सोनल: तुझा संबंध संघटनेशी कसा आला?

परमेश्वर: तरुणांच्या अनेक समस्या आहेत. उच्च शिक्षण घेवुन राज्यात लाखो तरुण बेरोजगार आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही भाजप सरकार समोर आंदोलने केली. मात्र, भाजप सरकारने याची दखल घेतली नाही. डी.एड्, बि.एड्. स्पर्धा परीक्षा आणि वैद्यकीय शिक्षण घेऊन लाखो तरुण बेकार आहेत. सरकारने नोकरी भरती केली नाही, त्यामुळे व्यवस्थेविरोधात तरुणाईत रोष आहे. अशा तरुणांना एकत्र करुन संघटना स्थापन केली आणि मंत्रालयावर मोर्चा काढुन आमचा रोष व्यक्त केला. त्यानंतर संपुर्ण राज्यातील तरुणाईच्या समस्याची जाणीव झाली. त्यामुळे तरुणाईच्या समस्या जोपर्यंत आहेत तोपर्यंत हा लढा आम्ही चालू ठेवणार आहे.

दिव्या: 'संविधान नारी शक्ती' संस्थेच्या माध्यमातून महिला संक्षमीकरणाचं काम करते. मुलींनी शिक्षण घेतलं पाहीजे, शिक्षणामुळे आपल्या हक्काची जाणीव होते व हक्कासाठी मुली संघर्ष करतात. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते प्राशन केल्यावर माणूस घुरघुरल्याशिवाय राहणार नाही" त्यामुळे शिक्षण महत्त्वाचे आहे. रॉबिन हून आर्मीच्या माध्यमातून आर्थिकदृष्या मागास असलेल्या मुलांना शिक्षणाची सोय करत आहे. 

सोनल: तरुणाई चळवळीत सहभागी होत नाहीत, नेमकं कारण काय?

परमेश्वर: राजकारण आणि समाजकारण यांच्यात दोन क्लास असतात. एक मास लिडर तर दुसरा क्लास लिडर. मास लिडर हा थेट समाजाच्या संपर्कात असतो. समस्याचे मुळ कारण काय? याचा शोध घेवुन समस्यांवर उपाय शोधतो. प्रमाणिकपणे काम करत असताना त्याला समाज सहकार्य करतो, लोक ओळखतात, त्यांची प्रसिद्धी होते. तो संधीच्या शोधात असतो. मात्र, क्लास लिडर अशा प्रमाणिक तरुणांना संधी देत नाहीत. म्हणून तरुण चळवळीत सहभागी होत नाहीत. चळवळीपासून दुर जातात.   

दिव्या: मुलींनी चळवळीत सहभाग घेतला, आंदोलन केले, मोर्चे काढले तर समाज काय म्हणेल? याची भिती आई- वडीलांना असते त्यामुळे मुलींना कुटुंबाचे दडपण असते, म्हणून मुली चळवळीत सहभाग घेत नाहीत.

सोनल: ठाकरे सरकारकडून कोणत्या अपेक्षा आहेत?

परमेश्वर: "आम्ही मेघा भरती करणार" असे भाजप सरकारने आश्वासन दिले होते मात्र, दरवर्षी होणारी भरती सुद्धा कमी करुन भाजप सरकारने तरुणाईतच्या तोंडाला पाने पुसली. असे ठाकरे सरकारकडून होऊ नयेत अशी अपेक्षा आहे. महापोर्टल बंद करावे, 24 हजार शिक्षण भर्ती करावी, शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करावी, सर्वांना मोफत आरोग्य सुविधा द्याव्या, तसेच ‘रोजगार महामंडळा’ची निर्मिती करुन बेरोजगार तरुणांना काम द्यावे.

दिव्या: महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारासाठी सरकारने नविन कायदे करावे, जुन्या कायद्यात दुरुस्ती करुन कठोर कायदा करावा, भाजप सरकारने बंद केलेल्या शाळा पुन्हा सुरु कराव्यात, अत्याधुनिक सोयी- सुविधांनी सुसज्ज डिजीटल शाळांची निर्मीती करावी. सर्वांना मोफत शिक्षणाची सोय करावी या आपेक्षा सरकारकडून आहेत.

सोनल: उच्च शिक्षणाच्या कोणत्या समस्या सोडवणे गरजेचे आहे?

परमेश्वर: उच्च शिक्षणाची फी ही सर्वांत महत्त्वाची समस्या आहे. सामान्य कुटुंबातील विद्यार्थी उच्च शिक्षणाची भरमसाट फी भरु शकत नाही, त्यामुळे शिक्षणापासून युवक वंचित राहतात. फी नसल्यामुळे शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नयेत याची जबाबदारी सरकारने घेणे गरजेचे आहे. तसेच, समाजात पी. एचडी झालेले तरुण बेरोजगार आहेत. त्यांच्या हाताला काम नाही, त्यामुळे पी.एचडी धारक तरुण सेवकाची नोकरी करण्यासाठी तयार आहेत. मात्र, त्यांना नोकरी मिळत नाही. ही समस्या सोडवणे गरजेचे आहे. सरकार तरुणांना नोकरी देवु शकत नसेल तर, व्यवसायाची हमी घ्यावी.

सोनल: बेरोजगारी वाढण्याचं कारण काय?

परमेश्वर: नोकरी असलेल्या तरुणांना समाजात मान- सन्मान, प्रतिष्ठा दिली जाते. समाज त्यांच्याकडे आदर्श नजरेन पाहतो. त्यामुळे सर्वांनाच नोकरी हवी आहे. सरकार सर्वांना नोकऱ्या देवु शकत नाही. दरवर्षी 2 लाख तरुण एमपीएससी परीक्षा देतात. त्यातुन 5 हजार तरुणांना नोकरी मिळते. बाकीचे 1 लाख 95 हजार तरुण दरवर्षी बेरोजगार राहतात. यातुन बेरोजगाराचे प्रमाण वाढत आहे.  

सोनल: रोजगारासाठी तरुणांनी काय केल पाहीजे?

दिव्या: नोकरी मिळत नसेल तर तरुणांनी शेती, व्यवसाय केली पाहीजे. तरुणांनी शेतीकडे व्यवसायिक दृष्टीकोनातून पाहीलं पाहीजे आणि आधुनिक पद्धतीने शेती केली पाहीजे. कोणताही व्यवसाय करताना स्वाभिमान बाळगला पाहीजे.

सोनल: चळवळीच्या माध्यमातून तरुणांना काय संदेश द्याल?

परमेश्वर: समाजातील शेवटच्या घटकापर्यंत तरुणांची नाळ जोडली असावी. समाजिक समस्या सोडवण्यासाठी राजकारणात गेलं पाहीजे. राजकारणाच्या माध्यमातून समाजातील अनेक प्रश्न सोडवु शकता. त्यामुळे तुम्हाला समाजाचे प्रतिनिधीत्त्व करण्याची संधी मिळते. त्या संधीच सोनं केलं पाहीजे.  

दिव्या: समाजाला हक्क आणि अधिकार मिळवुन देण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग प्राशसनात जाणे, दुसरा मार्ग राजकारणात येणे. प्रशासनात सर्वांना संधी मिळत नाही. त्यामुळे तरुणींनी आपल्या हक्कासाठी राजकारणाचा मार्ग स्वाकारावा. राजकारणात आल्यानंतर प्रशासनाला आदेश देऊ शकतो आणि समाजाच्या समस्या सोडवू शकता.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News