२० वर्षे महिलांच्या अन्यायाविरुद्ध लढा...

महेश घोलप
Wednesday, 2 September 2020

२० वर्षे महिलांच्या अन्यायाविरुद्ध लढा...

२० वर्षे महिलांच्या अन्यायाविरुद्ध लढा...

नवरा मिल्ट्रीत असताना, सांगली जिल्ह्यातील ३२ शिराळा तालुक्यातील चरण गावामध्ये राहून शाहू-फुले-आंबेडकर यांची पुस्तकं वाचनात आल्यानंतर आपण समाज्यासाठी काहीतरी देणं लागतो. या विचाराने प्रेरित होऊन महिलांवरती होणाऱ्या अन्यायाविरुद्ध किंवा महिलांना सक्षम करण्यासाठी अपर्णा रघुनाथ मुजुमले यांनी संपदा ग्रामीण महिला संस्थेमध्ये सहभागी होऊन समाज कार्याला सुरुवात केली.

‌संसाराचा गाडा चालवत असताना, लहानमुलं, नवरा मिल्ट्रीत असं सर्व असताना अपर्णा यांनी गावोगावी फिरून महिलांना मदत केली. विविध प्रकरण हाताळताना त्यांना खूप त्रासही सहन करावा लागला. पण न थकता २० वर्षे सेवा केल्यानंतर आता मनाला वेगळाच आनंद मिळतो. कारण चार मुलांपैकी दोन मुलींचं शिक्षण पूर्ण झालं. आणि दोन पदव्युत्तर शिक्षणाच्या उंबरठ्यावर आहेत.

मागील वीस वर्षात त्यांनी ३२ शिराळा तालुक्यातल्या अनेक शाळांना भेटी दिल्या. शाळेत गेल्यानंतर मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन विद्यार्थ्यांनीशी मुक्त पध्दतीने संवाद साधला. हे करत असताना त्यांना अनेक समस्या असल्याचे दिसून आले. त्यांनी प्रत्येक शाळेत जाऊन मुलींना वयोमर्यादाच्या अनुशंगाने मार्गदर्शन केले. त्याचबरोबर समस्येचा सामना कसा करायचा असतो याबाबत सुध्दा मार्गदर्शन केले.

हे करत असताना अनेक प्रकरण मिटवता असताना, अनेक गोष्टी माझ्यासाठीही नवीन होत्या, त्यावर काय उपाय करायला हवेत यासाठी अनेकदा संस्थेच्या माध्यमातून अनेकांशी संपर्क साधला आहे. तसेच अन्याय होत असलेल्या महिला किंवा मुलींना त्यातून बाहेर काढलेलं आहे असं अपर्णा मुजुमले यांनी सांगितले.

समाज्यामध्ये, कुटुंबात, शाळेत, महाविद्यालयात आणि अन्य ठिकाणी महिला-मुलींवरती अत्याचार किंवा छळ होत असेल तर नक्की माझ्याशी संपर्क साधा मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून नक्की तुम्हाला मदत करेल. - अपर्णा मुजुमले

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News