भारतीय युवक विश्‍वकरंडक क्रिकेटमध्ये पाचव्यांदा विजेता 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 February 2020

परिणामी, १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाचव्यांदा विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न भंगले. परिस्थिती अवघड झालेली असली, तरी अखेपर्यंत लढा देणाऱ्या बांगलादेशने पहिल्यांदा विजेतेपद मिळविले.  

पोचेस्ट्रुम संपूर्ण स्पर्धेत प्रामुख्याने फलंदाजीत दिमाखदार कामगिरी करणारी भारतीय फलंदाजी अंतिम सामन्यात ढेपाळली. परिणामी, १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाचव्यांदा विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न भंगले. परिस्थिती अवघड झालेली असली, तरी अखेपर्यंत लढा देणाऱ्या बांगलादेशने पहिल्यांदा विजेतेपद मिळविले.          

उपांत्य सामन्यात पाकिस्तानच्या १७२ धावांचे आव्हान एकही फलंदाज न गमावता पार करणारा भारतीय संघ १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या अंतिम सामन्यात मात्र १७७ धावांत गारद झाला.

यशस्वी जैसवाल एकाकी लढत असताना त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. बांगलादेशने हे आव्हान तीन विकेटने पार केले. पण, अंतिम क्षणी आलेल्या पावसामुळे आणि परिणामी डकवर्थ लुईसच्या आकडेवारीने बांगलादेशचा विजय सोपा झाला.

केवळ १७७ धावांचे पाठबळ असल्यामुळे बांगलादेशचा डाव गुंडाळण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यातच बांगलादेशला ५० धावांची सलामी मिळाली होती. परंतु, त्यानंतर बिष्णोईच्या लेगस्पिन माऱ्याने बांगलादेशचे एकेक फलंदाज बाद होत गेले. त्यांचा निम्मा संघ ८५ धावांत बाद झाला तेव्हा भारतालाही विजयाची समान संधी मिळाली होती.

कमालीचा संघर्ष सुरू असताना सलामीवीर परवेझ इमोन आणि अकबर अली यांनी सातव्या विकेटसाठी ४१ धावांनी भागीदारी करून सामना बांगलादेशच्या बाजूने झुकवला. तत्पूर्वी, येथे गेले दोन दिवस रात्री पाऊस पडत होता.

त्यामुळे आज सकाळी सूर्यप्रकाश असला, तरी प्रथम फलंदाजी सोपी नव्हती. त्यातच भारतीय कर्णधार प्रियम गर्गने नाणेफेक गमावली. त्यामुळे आव्हानात्मक परिस्थितीत प्रथम फलंदाजी करण्याची वेळ भारतावर आली. 

यशस्वी जैसवाल आणि तिलक वर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. अवघड परिस्थिती सांभाळली होती. येथून पुढे धावांचा वेग वाढविला जाण्यासाठी प्रयत्न केले जाणार इतक्‍यात वर्मा बाद झाला.

त्यानंतर लगेचच कर्णधार प्रियम गर्ग माघारी फिरला. त्यामुळे पुन्हा दडपण आले. यशस्वी ८८ धावांवर बाद झाला. त्यानंतर भारताचा हा पुढचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. अखेरच्या सहा फलंदाजांपैकी एकालाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News