'मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' हे क्षेत्र इतर करिअरपेक्षा वेगळे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 30 December 2019

विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात कॅमेरा हाताळणी, जाहिरात यासह मीडिया संबंधित विषयांचा त्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असल्याने ही शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली

जळगाव : मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम हे क्षेत्र प्रचलित ज्ञात असलेल्या करिअरपेक्षा वेगळे असून माणसाचे सर्वांगीण अंगीभूत गुण विकसित करणारे व्यासपीठ आहे. बदलत्या काळाची पावले ओळखत पत्रकारितेचे स्वरूप देखील व्यापक झाले आहे, असे विचार मू. जे. महाविद्यालयातील जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा. संदीप केदार यांनी व्यक्त केले.

भडगाव तालुक्‍यात असलेल्या कर्मवीर तात्यासाहेब हरीरावजी पाटील किसान शिक्षण संस्था, भडगाव संचालित जवाहर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. विद्यार्थ्यांना पत्रकारिता, कॅमेरा, जनसंपर्क अधिकारी, जाहिरात याबाबतीत विभागातील प्राध्यापकांनी मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या मनात या क्षेत्राबाबतtतसेच माध्यमांविषयी असलेले अनेक समज-गैरसमज दूर केलेत.

प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या शकांचे निरसनही केले. विद्यार्थ्यांनी कॉन्फरन्स हॉल, विभागाचा स्टुडिओला भेट दिली तसेच कॅमेरा समोरील लाइव्ह रिपोर्टिंग याबाबत प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ही करण्यात आले. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात कॅमेरा हाताळणी, जाहिरात यासह मीडिया संबंधित विषयांचा त्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असल्याने ही शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती. 

व्यासपीठावर जवाहर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज प्राचार्य ए. बी. बोरसे, उपशिक्षिका विजया पाटील, प्रा. रमेश धनगर, प्रा. दीपक हिरे, कैलास पाटील व यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालयातील तीस विद्यार्थी तसेच जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे प्रा. अभय सोनवणे, प्रा. केतकी सोनार, प्रा. प्रशांत सोनवणे, संजय जुमनाके उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News