गर्भातील कळी 

माजी विद्यार्थीनी शिल्पा नरवडे, गरवारे मुंबई इन्स्टिट्यूट (इन्व्हर्सिटी)
Tuesday, 15 September 2020

आई तुझ्या हृदयाचा आवाज किती गं मधुर होता।
तुझ्या प्रत्येक स्पंदणार माझा छोटासा जीव होता।

आई किती मंद तो प्रकाश तुझ्या गर्भामध्ये होता।
स्वर्गातला तो काळ माझ्या भोवतालीचं होता।
एकटाच मी अन माझ जग तूच होतीस।
या भयान जगापासून मला लपवत तूच होतीस।
आई तुझ्या हृदयाचा आवाज किती गं मधुर होता।
तुझ्या प्रत्येक स्पंदणार माझा छोटासा जीव होता।
तुला आणि मला जोडणारी एक नाजूक कोमल अशी दोर आत होती।
तुझी ती नाळ ती जणू नाजूक वेल  मला लपेटलेली होती।
तुझा आवाज येताच ओठ माझे हसायचे।
अन कान माझे फक्त आणि फक्त तुझ्या आवाजाला तरसायचे।
तू स्वतःला किती किती जपायचीस गं।
आणि एक मी जगावं म्हणून तू किती कितीदा मरायचीस गं।
जन्म मला देताना किती सोसलेस तू त्रास।
पण फक्त मी जगावं हाच होता तुझा ध्यास।
गर्भातले ते नऊ महिने पुन्हा नाही येणार गं।
आणि मी तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही।

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News