मुंबईकरांना संगीत नाट्य महोत्सवाची पर्वणी 

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Friday, 29 March 2019

मुंबई : संगीत नाटकांच्या पुनरुज्जीवनासाठी गेली अनेक वर्षे दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने संगीत नाट्य महोत्सव आयोजित करण्यात येतो. नाट्यप्रेमींसाठी ही पर्वणी विमल ट्रस्टच्या सहयोगाने 5 ते 7 एप्रिल 2019 या कालावधीत संगीत नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने साजरी होणार आहे. मुंबईकरांना पुन्हा एकदा संगीत नाटकाचा आनंद घेता येईल. 

शुक्रवार 5 एप्रिलला देवल स्मारक मंदिर, सांगली या संस्थेचा "संगीत मंदारमाला' चा प्रयोग होणार आहे. शनिवार 6 एप्रिलला अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी या संस्थेतर्फे "संगीत मानापमान' सादर होणार आहे तर रविवार दिनांक 7 एप्रिलला रत्नागिरीच्या खल्वायन या नाट्यसंस्थेच्या "संगीत संशयकल्लोळ'चा प्रयोग होणार आहे. हे सर्व प्रयोग सशुल्क असून सायंकाळी 5.30 वाजता होतील.

प्रवेशिका तसेच अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 24304150 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News