हे मेथीचे लाडू असे बनवतात...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
 • मेथीचे लाडू

साहित्य 

 • मेथीचे पिठ १ वाटी (१०० ग्रॅम)
 • ५ वाट्या गव्हाचे पिठ
 • २ वाट्या रवा
 • १०० ग्रॅम डिंक
 • ५० ग्रॅम हालिम (अळीव)
 • २ वाट्या सुके खोबरे
 • ५ १/२ वाट्या गुळ
 • १ चमचा सुंठपावडर
 • अडीच ते ३ वाट्या साजुक तुप
 • खारीक बदामचे बारीक तुकडे

कृती

 1. मेथिचे पिठ आदल्या दिवशी तुपात भिजवत ठेवा. त्यामुळे कडूपणा कमी होतो.
 2. सुके खोबरे किसुन मंद आचेवर खरपुस भाजुन घ्या.
 3. खारीक व बदाम बारीक करुन घ्या.
 4. तुपात थोडा थोडा डिंक घालुन तळा व थंड झाल्यावर तो कुस्करुन बारीक करा.
 5. चमचाभर तुपात हालिम (अळीव) तळून घ्या.
 6. भांड्यात दिड वाटी तुप घालुन रवा व गव्हाचे पिठ मंद गॅसवर खरपुस भाजुन घ्या व भाजल्यावर एका परातीत काढा.
 7. त्या पिठात भिजत घातलेले तुप भाजलेल्या पिठा घाला व हाताने चांगले फेसुन मेथिच्या पिठाच्या गुठळ्या मोडा.
 8. आता त्यात भाजलेले खोबरे जरा कुस्करुन घाला. बारीक केलेले बदाम व खारीक घाला. सुंठपावडर व डिंक घाला व चांगले मिसळा.
 9. आता एका मोठ्या भांड्यात १ चमचा तुप टाकुन गुळ चिरुन टाका. आता गॅस एकदम मंद ठेवा व गुळ विरघळेपर्यंत ढवळा. गुळ विरघळला की लगेच गॅस बंद करा.
 10. भांडे गॅसवरुन काढून त्यात लगेच पिठाचे मिश्रण घाला व चांगले ढवळा.
 11. आता पटापट लाडू वळून घ्या.
 12. झाले लाडू तयार.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News