पुरेसा आहार घेऊनही जाणवतोय थकवा ? तर असू शकते या व्हिटॅमिनची कमतरता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 February 2020
  • वाढत्या वयानुसार मानवी शरीरात अनेक बदल होत असतात.आणि त्याच बदलानुसार योग्य तो आहार घेणे घरजेचे असते. परंतु जर तुम्ही योग्य आहार घेत असला आणि तरीही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असू शकते.

वाढत्या वयानुसार मानवी शरीरात अनेक बदल होत असतात.आणि त्याच बदलानुसार योग्य तो आहार घेणे घरजेचे असते. परंतु जर तुम्ही योग्य आहार घेत असला आणि तरीही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असू शकते.याचसोबत 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेची अनेक लक्षणे असतात. ती आपण जाणून घेऊयात. 

हाडांमध्ये वेदना- हाडांमध्ये मजबुती असणे खूप महत्वाचे असते.वयवर्षे ४०-५० या वयोगटातील लोकांना स्नायूंचे आजार होत असतात. परंतु जर कमी वयातच हाडं आणि स्नायूंमध्ये वेदना होत असतील तर नक्कीच तुमच्या शरीरात 'व्हिटॅमिन डी' कमतरता असू शकते. 

केस गळणे-  लहानांपसुन मोठ्यांपर्यंत अनेकांना केस गळतीची समस्या जाणवते. त्यावर अनेक उपायही उपलब्ध असतात. परंतु सर्व उपाय करूनही केस गळती थांबत नसेल तर याचे कारण म्हणजे 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता. त्यामुळे योग्य वेळीच यावर उपाय करणे घरजेचे आहे. 

उदास राहणे (मूडमध्ये होणारे बदल)- विशेषतः स्त्रियांमध्ये 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता असल्यास त्या तणावाखाली असतात आणि त्यामुळे  त्यांच्या स्वभावामध्ये बदल जाणवू लागतात. त्यामध्ये चीड चीड करणे, निराश राहणे तसेच उदासीनता असे स्वभावात फरक आढळून येतात. 

जखम लवकर न भरणे- व्हिटॅमिन डी ची कमतरता असलेल्या व्यक्तीला जखम झाल्यास ती लवकर भरत नाही.

त्याचप्रमाणे वारंवार डोकं दुखणं, मळमळ होणं, अशी अनेक लक्षणं व्हिटॅमिन डी च्या कमतरेची दिसून येतात. जर तुम्हीदेखील या लक्षणांना सामोरे जात असाल तर योग्य वेळीच यावर उपचार करून घेणे गरजेचे आहे.   

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News