फेडरर ऑगस्टच्या मध्यापासून टेनिस प्रशिक्षणाला सुरुवात करणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 July 2020
  • स्विझर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडरर ऑगस्टच्या मध्यापासून आपल्या टेनिस प्रशिक्षणाला सुरुवात करणार आहे

मुंबई ज्यूरिख : स्विझर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडरर ऑगस्टच्या मध्यापासून आपल्या टेनिस प्रशिक्षणाला सुरुवात करणार आहे, सध्या तो पियरे पगनिनीबरोबर प्रशिक्षण घेतोय, असे त्याच्या प्रशिक्षक सेव्हरीन लूथी यांनी सांगितले. पुरुष एकेरीत 20 ग्रॅंड स्लॅमजेतेपद पटकावणाऱ्या फेडररच्या उजव्या गुडघ्यावर फेब्रुवारीत शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यातून तो सावरत असताना काही आठवड्यांपूर्वी दुखापतीने पुन्हा डोके वर काढले आणि पुन्हा शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया ओपनच्या उपांत्य सामन्यात नोवाक जोकोविचकडून सरळ सेटमध्ये सामना गमवावा लागला. त्यानंतर त्याने टेनिसचा उर्वरित हंगामच न खेळण्याचा निर्णय घेतला होता. ""रॉजर ठीक आहे. तो खूप चांगला आहे, त्याला आलेल्या परिस्थितीला सामोरे कशा प्रकारे जायचे हे त्याला चांगले ठाऊक आहे, असे लुथी यांनी ली प्रो कपच्या स्पर्धेच्या उद्‌घटनावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, 2021 च्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुनरागमन करण्याच्या ऐवजी त्याआधीच्या स्पर्धा खेळण्याची शक्‍यता आहे, त्या वेळी कशा प्रकारे परिस्थिती असेल याचा विचार करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. तसेच फ्रेंच ओपन स्पर्धा न खेळण्याचे फेडररने आधीच स्पष्ट केले आहे. याव्यतिरिक्त कोव्हिड- 19 साथीच्या रोगामुळे विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्यात आली, त्याचबरोबर फ्रेंच ओपन, यू यस ओपन या स्पर्धा अनिश्‍चित काळासाठी तहकूब करण्यात आल्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News