आवड लाँग रूटची!

दीप्ती धोत्रे, अभिनेत्री
Thursday, 23 May 2019

मला बाईक्‍सचीही आवड आहे. स्पोर्टस बाईक्‍स चालवता येतात. माझ्याकडे ॲक्‍टिव्हा ही टू व्हिलर गाडी आहे. माझा आजपर्यंत गाडी चालवताना कधीही अपघात झालेला नाही; पण गाडी चालवताना व्हिडीओ शूट करण्याची फार सवय आहे.

(शब्दांकन : स्नेहल सांबरे)​

मला गाड्यांची खूप जास्त आवड आहे. सहा वर्षांपूर्वी गाडी शिकायला मी ड्रायविंग क्‍लासेस लावले होते. माझ्या पहिल्या कमाईतून मी वॉक्‍सवॅगन वेंटो ही पांढऱ्या रंगाची गाडी घेतली. ही गाडी घेण्यासाठी माझ्या आईने अर्धी रक्कम दिली होती. उर्वरित रक्कम भरण्यासाठी कर्ज काढले होते. हळूहळू ते कर्ज फेडले. त्या वेळी मी मालिकांचे एडीटिंग करत असे. मला स्पोर्टस कार खूप आवडतात. भविष्यात एखादी स्पोर्टस कार घ्यायला नक्की आवडेल. 

गाड्यांमध्ये लाल रंग मला फार आवडतो. वॉक्‍सवॅगन वेंटोनंतर मारुतीची वॅगन आर घेतली. माझी वॉक्‍सवॅगन वेंटा ही गाडी माझ्या घरी सोलापूरला असते. मुंबईत गाडी हवी म्हणून मी वॅगन आर ही गाडी घेतली. कारण मुंबईत फार ट्रॅफिक असतं. ही गाडी आकाराने लहान असल्याने मुंबईच्या ट्रॅफिकमधून पटकन बाहेर काढता येते. पार्किंग करतानाही सोपं पडतं.

मला बाईक्‍सचीही आवड आहे. स्पोर्टस बाईक्‍स चालवता येतात. माझ्याकडे ॲक्‍टिव्हा ही टू व्हिलर गाडी आहे. माझा आजपर्यंत गाडी चालवताना कधीही अपघात झालेला नाही; पण गाडी चालवताना व्हिडीओ शूट करण्याची फार सवय आहे. मी सतत गाडी चालवताना व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर टाकत असते. माझा पुणे-मुंबई प्रवास जास्त होत असतो. लाँग रूटला गाडी चालवायची सवय आहे. एकदा चित्रपटाचे चित्रीकरण मालेगाव येथे सुरू होते. मला त्या चित्रीकरणासाठी तिथे पोहोचायचे होते. मला काही इतर काम असल्याने आमच्या टीमला मी पुढे जायला सांगितले. माझे काम संपवून चित्रीकरणासाठी निघायला खूप उशीर झाला.

मी संध्याकाळी सातला मुंबईहून निघाले आणि मला वाटलं की मालेगाव मुंबईपासून जास्त लांब नाही आणि मी लवकर पोहोचेन. मी भिवंडीपर्यंत पोहोचले आणि मला तिथे खूप ट्रॅफिक मिळालं.

खूप रात्र झाली असल्याने रस्त्यावर मी एकटीच गाडी चालवत होते आणि माझ्या आजूबाजूला मला फक्त ट्रक दिसत होते. त्या वेळी मला मालेगावला पोहोचायला सकाळचे साडेचार वाजले होते. मी पहिल्यांदाच अशी नॉनस्टॉप गाडी चालवली होती. त्या वेळी मी खुप घाबरले होते आणि आमचे दिग्दर्शक खूप ओरडले होते. तेव्हापासून मी ठरवले की लाँग रूटवर मी कधीही एकटी गाडी चालवणार नाही. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News