PUB- G ला टक्कर देणार FAU-G; अक्षय कुमारने केले ट्विट आणि म्हणाला...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 4 September 2020

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने धडाकेबाज ट्विट केले. 'PUB-G ला टक्कर देणार FAU-G'. अशा प्रकारच ट्विट अक्षय कुमारने केले.

मुंबई: तरुणाईला वेड लावणाऱ्या पब्जी मोबाईल गेमवर केंद्र सरकारने अखेर बंदी घातली. त्यामुळे तरुणाई बेभाण झाली. सोशल मीडियावर पब्जीच्या समर्थनार्थ काही मिम्स व्हायरल झाले, यावर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने धडाकेबाज ट्विट केले. 'PUB-G ला टक्कर देणार FAU-G'. अशा प्रकारच ट्विट अक्षय कुमारने केले. हे ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. FAU-G गेममधून मिळणाऱ्या उत्पनापैकी एक तृतांश हिस्सा अमर जवानाच्या ट्रस्ट मध्ये जाणार आहे. ही ट्रस्ट केंद्रीय गृह मंत्रालयाने स्थापन केली.

'प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपण सुरु केलेल्या आत्मनिर्भय अभियानाचा गर्व वाटतो. भारतीय बणावटीचा एक्शन गेम FAU-G लॉन्च केल्यामुळे खुप आनंद झाला. मनोरंजनातून भारतीय सैनिकाविषयी प्लेअर्सना माहिती मिळू शकेल. सैनिकांच्या बलिदानाचा इतिहास तरुणांना कळेल. गेम मधून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी २० टक्के निधी अमर जवानांच्या ट्रस्ट मध्ये जाणार आहे.' असे अभिनेता अक्षय कुमारने ट्विटमध्ये लिहले आहे.

भारत चीन यांच्या सीमावादामुळे केंद्र सरकारने सुरुवातीला ४७ चीनी अॅपबर बंदी घातली होती. त्यात टिकटॉकसारखे अनेक लोकप्रिय अॅपचा समावेश होता. पुन्हा एकदा भारतीय सुरक्षेच्या कारणावरुन सरकारने ११८ चीनी अॅपवर बंदी घातली. त्यात पब्जीचा समावेश आहे.  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News