...म्हणून वडिलांनी चक्क डीजे लावून काढली मुलाची अंत्ययात्रा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 February 2020
  • शुक्रवारी सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान प्रणव सरावासाठी बाहेर पडला. शास्त्रीय स्टेडियमजवळ असलेल्या क्रीडा प्रबोधनीमध्ये त्याने गळफास लावला.

अकोला : कोणता कार्यक्रम किंवा आनंदी सोहळा असेल तर डीजे लावून थाट केला जातो. मात्र अकोल्यात चक्क डीजे लावून तरुणाची अंत्ययात्रा काढण्यात आली. डीजे लावून सुद्धा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते. ही अनोखी अंत्ययात्रा होती, बॉक्सर प्रणव राऊत याची..! महाराष्ट्रासाठी अनेक सुवर्णपदके जिंकलेल्या प्रणव याने २२ व्या वर्षी गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे संपूर्ण शहराला धक्का बसला आहे. 

नागपूरमध्ये राहणारा प्रणव राऊत याने आपल्या स्टेडियमजवळच गळफास घेऊन जीवन संपवले. शुक्रवारी सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान प्रणव सरावासाठी बाहेर पडला. शास्त्रीय स्टेडियमजवळ असलेल्या क्रीडा प्रबोधनीमध्ये त्याने गळफास लावला. प्रणवने महाराष्ट्रासाठी आजपर्यंत अनेक सुवर्णपदके जिंकली होती. ही घटना समजताच क्रीडा प्रमुखांनी त्याठिकाणी धाव घेतली. 

प्रणव अत्यंत हुशार खेळाडू आहे. मात्र आंतरराष्ट्रीय निवड चाचणीसाठी एक सामना झाला होता, त्यामध्ये प्रणव अपयशी झाला. त्या नैराश्यातून प्रणवने आत्महत्या केली. आत्महत्येबाबत प्रणवने पात्र लिहिले आहे. त्यामध्ये "बाबा, मला माफ करा, मी तुमचं स्वप्न पूर्ण केलं नाही," असं देखील लिहिलं होते. 
हे ऐकून तर सर्वानाच धक्का बसला. 

आपली अंत्ययात्रा डीजे काढून निघावी, अशी इच्छा प्रणवने त्याच्या वडिलांकडे बोलून दाखविली होती, त्यामुळे वडिलांनी आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करत अंत्ययात्रेत डीजे लावला. दरम्यान याबाबत पोलिसांना माहिती दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News