बाप रे! चक्क २४२ विद्यार्थ्यांना मिळवले १०० टक्के मार्क

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 29 July 2020
  • फक्त पास होण्याचे प्रमाण वाढले नाही तर गुणात्मक वाढ झाली.

मुंबई : यंदा दहावीचा आश्चर्यकारक निकाल लागला. तब्बल २४२ विद्यार्थ्यांना १०० टक्के मार्ग मिळाले आहे. आनंदाची बाब म्हणजे यंदा निकालात मोठी वाढ झाली आहे. फक्त पास होण्याचे प्रमाण वाढले नाही तर गुणात्मक वाढ झाली. ८३ हजार २६३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. दहावीच्या रेकॉर्ड ब्रेक निकालाची नोंद इतिहासात होणार आहे.

अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेला दहावी परीक्षेचा निकला अखेर बुधवारी (ता. २९) जाहीर झाला. काही दिवसांपासून दहावीच्या निकालाची उत्सूक्ता विद्यार्थी आणि पालकांना लागली होती. ही उत्सूकता आज शिगेला पोहचली होती. कधी एकदाचा निकाल पाहतो आणि सुटकेचा श्वास सोडतो अशी विद्यार्थ्यांची परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा निकाल चांगला लागल्यामुळे विद्यार्थी पालकांनी आनंद व्यक्त केला.   

कोकण विभाग प्रथम

दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. सर्वांधिक ९८. ७७ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. कोकण विभाग क्षेत्रफळाने मोठा असला तरी विद्यार्थी संख्येने छोटा आहे, काही हजार विद्यार्थी सख्या कोकण विभागाची आहे. त्यामुळे दरवेळी प्रथम येण्याचा मान कोकण पटकावतो. यंदा १५, ५७, १०३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती, त्यामधून १५, १, १०५ विद्यार्थी पास झाले तर मुलींचे प्रमाण ९७. ९१ टक्के तर मुलांचे प्रमाण ९३.९० टक्के आहे. यंदाही गुणवत्तेमध्ये मुलींने बाजी मारली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News