वडिलांनाी मुलासाठी केली भन्नाट स्कूटर; फोटो झाले व्हायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 August 2020

वडिलांनाी मुलासाठी केली भन्नाट स्कूटर; फोटो झाले व्हायरल  

वडिलांनाी मुलासाठी केली भन्नाट स्कूटर; फोटो झाले व्हायरल  

पंजाब - कोरोनाच्या काळात अनेकांना आपला संसार चालवणं जिकिरीचं झालं आहे. कारण कोरोनाच्या काळात अनेकांचं अर्थिक चक्र जागीचं रूतलं आहे. त्यामुळे अनेकांना नवीन वस्तू घेणं अवघड झालं आहे. अशा परिस्थितीत पंजाबमधील नागरिकाने आपल्या मुलासाठी चक्क घरी स्कूटर बनवली आहे. या स्कूटरचे सध्या फोटो प्रचंड व्हायरल झाले असून मुलाची  इच्छा पुर्ण करण्यासाठी वडिलांनी हा जुगाड केला आहे.

पंजाब राज्यातील लुधियानातील लखोल गावात आठवीच्या वर्गात शिकणा-या हरमनजोतने आपल्या वडिलांकडे बाईकची मागणी केली. परंतु कोरोनाच्या काळात गाडी घेण शक्य नसल्याने त्यांच्या वडिलांनी स्कूटरसारखी सायकल तयार केली आहे. या सायकलचा पुढचा भाग स्कूटरचा आहे. तर मागे सायकलचे चाक लावण्यात आले आहे. हे करत असताना मुलाने देखील वडिलांना मदत केली आहे. तसेच वडिलांनी तयार केलेली स्कूटर मुलगा आनंदाने चालवत आहे.

तयार झालेल्या स्कूटरवर सोशल मीडियावरती अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच फोटो प्रचंड व्हायरल केले आहेत. काहीनी व्हायरल झालेल्या व्हिडीओला देशी जुगाड असं म्हटलं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News