पायातील जोडव्यांची फॅशन नव्या रूपात...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 5 August 2019

भारतीय परंपरेनुसार लग्नानंतर स्त्रिया आपल्या पायात जोडवी घालतात. काळानुरूप बदलत्या फॅशननुसार ही जोडवी ओल्ड फॅशन झाल्याने अनेक महिला जोडवी घालणे टाळतात. पुढे पुढे ही पद्धत बंद होते की काय, असे वाटू लागताच आजच्या युथने याच गोष्टी नव्या नावाने आणि नव्या रूपात पुन्हा वापरायला सुरुवात केली आहे. केवळ लग्न झालेल्या महिलाच नाही; तर लग्न न झालेल्या तरुणीही बिनधास्त या टो रिंग पायाच्या बोटांत घालून वावरताना दिसतात.

भारतीय परंपरेनुसार लग्नानंतर स्त्रिया आपल्या पायात जोडवी घालतात. काळानुरूप बदलत्या फॅशननुसार ही जोडवी ओल्ड फॅशन झाल्याने अनेक महिला जोडवी घालणे टाळतात. पुढे पुढे ही पद्धत बंद होते की काय, असे वाटू लागताच आजच्या युथने याच गोष्टी नव्या नावाने आणि नव्या रूपात पुन्हा वापरायला सुरुवात केली आहे. केवळ लग्न झालेल्या महिलाच नाही; तर लग्न न झालेल्या तरुणीही बिनधास्त या टो रिंग पायाच्या बोटांत घालून वावरताना दिसतात.

फॅशनेबल रुपडं घेऊन आलेल्या या ॲक्‍सेसरींजनी शॉपिंग स्ट्रीट, नॉव्हेल्टी; तसंच सोने-चांदीच्या दुकानांत स्वतंत्र अशी जागा पटकाविली आहे.खरे तर लग्नाआधी जोडवी घालू नयेत, असे बोलले जात असे. पायात जोडवी दिसली म्हणजे हिचे लग्न झाले आहे. ते एक सौभाग्याच लेणं आहे. परंतु फॅशनच्या बदलत्या संकल्पनेत ही जोडवी ओल्ड फॅशन वाटू लागल्याने अनेक विवाहित स्त्रियांनी ती घालणे सोडून दिले.

याच जोडवींना डिझायनरांनी वेगळा आणि फॅशनेबल लूक देण्याचा प्रयत्न केला असून, जोडव्यांमध्ये सध्या टो रिंग नावाचा प्रकार खूप ट्रेण्डी होत आहे. या टो रिंग केवळ विवाहित महिला वापरत नसून, अविवाहित तरुणीही त्या जुन्या परंपरा विचार मोडून बिनधास्त परिधान करू लागल्या आहेत. पायाचे सौंदर्य या टो रिंग आणखी खुलवत असल्याने त्यांची जबरदस्त चलती आहे.

मोती, स्टोनच्या जोडव्यांचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्यात स्टीलची जोडवी विशेष आकर्षक दिसतात. स्टर्लिंग सिलव्हरटो रिंगने तर आंतरराष्ट्रीय बाजारातही स्थान मिळविले आहे. प्लॅटिनमसारख्या व्हाईट मेटलच्या टो रिंग फॉर्मल व कॅज्युअल अशा दोन्ही प्रसंगी घालता येतात. आजकाल प्लास्टिकची, रबरची नाजूक दिसणारी जोडवीही फॅशनमध्ये आहेत.

जोडवे खासकरून अंगठ्याच्या बाजूच्या बोटात घातले जाते. त्यातही केवळ गोल वेढ्यांची जोडवी असत. बदलत्या फॅशनसोबत टो रिंग तुम्ही कुठल्याही बोटात घालू शकता. ही जोडवी कोणत्याही ड्रेससोबत घालून मॉर्डन लूक मिळवता येतो. हार्टशेप, फुलं-पानांच्या आकारांसारख्या विविध डिझाईनमध्ये ही जोडवी सध्या उपलब्ध आहेत. टो रिंग शहरातील कोणत्याही नॉव्हेल्टीमध्ये, सोने-चांदीच्या हव्यात तर सोनाराकडे; याबरोबरच अगदी बाजारात किंवा ट्रेनमध्ये अंगठी विकणाऱ्या विक्रेत्यांकडेही ही खास जोडवी विकायला असतात.

ट्रेन, बाजारात प्लास्टिक, रबराची जोडवी अगदी १० ते २० रुपयांपर्यंत मिळतात. स्टिल, जर्मन, साध्या डिझाईनची जोडवी २० ते ४० रुपयांपर्यंत.भुलेश्वर मार्केट, ठाण्यातील गावदेवी, जांभळी नाका मार्केट, डोंबिवलीतील मधुबन टॉकीज गल्ली परिसरात खास चांदीची वाटतील अशी जोडवी मिळतात. यात अनेक खडे आणि आकार उपलब्ध आहेत. याची किंमत ३० ते ५० रुपयांपर्यंत आहे.थोडा ब्रॅण्ड चेंज केला, तर १०० रुपयांपासून पुढील किमतीतही जोडवी दुकानांत उपलब्ध आहेत. गॅरेंटीसह ही जोडवी तुम्हाला मिळतील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News