बदलत्या वेळेनुसार पेहराव बदलणे ही काळाची गरज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

फॅशन कायम बदलत असते, असे आपण नेहमीच वाचतो, ऐकतो आणि या बदलत्या फॅशनला आत्मसात करणे म्हणजेच फॅशनेबल राहणं, असं म्हणावं लागेल. आता बघा ना, जी फॅशन आपण कळत नकळत किंवा गरज म्हणून लहानपणापासून फॉलो करत आहोत, तीच परदेशात धुमाकूळ घालत आहे. विचारात पडलात ना? हो आपण थंडीपासून किंवा उन्हापासून संरक्षणासाठी सॅन्डल, शूजमध्ये सॉक्स वापरतो. मात्र सध्या हाय हिल्ससोबत मोठे सॉक्स घालण्याची ट्रेन्ड आला आहे. फॅशनची राजधानी समजली जाणाऱ्या मिलान, न्यूयॉर्क, पॅरिस, लंडनमध्ये होत असलेल्या फॅशन शोजमध्ये याचीच चलती दिसते. आपल्या ‘बी टाऊन’मध्येदेखील हा ट्रेन्ड रुजू होताना दिसतो. 

लहानपणापासून आपण सॅन्डलमध्ये सॉक्स घालत आहोत. तुम्ही म्हणाल यात फॅशन काय आहे? परंतु मुलींनो, आपण नेहमी करत असलेल्या स्टाईलपेक्षा ही फॅशन हटके पद्धतीने केली जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या हिल्समध्ये गुडघ्याएवढे किंवा त्यापेक्षा थोडे कमी उंचीचे कॉटन, नायलॉनचे सॉक्स घातल्यास खूप भारी लूक येतो. रोज काहीतरी वेगळं ट्राय करणाऱ्यांसाठी हे करून बघायला काही हरकत नाही. काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोणनं वर्ल्ड इकॉनॉमी फोरमच्या कार्यक्रमासाठी हा लूक निवडला होता. तुम्ही या वीकएण्डला पार्टीच्या मूडमध्ये असल्यास डेनिम शर्ट, प्लिटेड स्कर्ट, मॅक्सी ड्रेस, वनपिसवर ही स्टाईल करून बघाच. हिल्स विथ सॉक्स 
ट्रेन्डी कॉम्बो
हे लक्षात ठेवा
तुम्ही कोणता ड्रेस घालणार आहात, यावर सॉक्सचा रंग निवडा. फंकी लुकसाठी निऑन रंग ट्राय करून बघा. 

नेटेड, विविध कार्टुनच्या डिझाईन, झालर, लेस, स्टार आणि स्ट्राइप पॅटर्न सॉक्स मार्केटमध्ये किंवा ऑनलाइन मिळू शकतात. 

उन्हाळा सुरू झाल्याने तुमच्या सोईप्रमाणे ही स्टाईल करा. मात्र, एखाद्या दिवशी सगळ्यांपेक्षा भारी दिसायचं असल्यास हा पर्याय कुल राहील.

तुम्ही कोणत्याही वेस्टर्न आउटफिटवर हिल्सवर घालू शकता. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News