फॅशन; दिवाळीची, तरुणाईच्या सेलिब्रेशनची

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Monday, 21 October 2019
  • सुंदर आणि सस्टेनेबल कपड्यांचा ट्रेण्ड बाजारात आवर्जून पाहायला मिळतो. हे सर्व पाहून तरूण-तरूणींचा ओढा घेरदार अनारकली, नक्षीदार साड्या, रेखीव कुर्ते खरेदी करण्यावर भर असतो.​

दिवाळीचा सण म्हटले की लहाणापासून थोरांपर्यंत एक पर्वणीच असते. या सणासाठी नवीन कपडे, दागिने खरेदी करण्याकडे तरूणाईचा ओढा असतो. मग त्यात नवनवीन फॅशन करून आणि वर्षभरातले ट्रेण्ड्‌स पाहून आपण इतरांपेक्षा आकर्षक कसे दिसू यासाठी चढाओढ असते. यातच सुंदर आणि सस्टेनेबल कपड्यांचा ट्रेण्ड बाजारात आवर्जून पाहायला मिळतो. हे सर्व पाहून तरूण-तरूणींचा ओढा घेरदार अनारकली, नक्षीदार साड्या, रेखीव कुर्ते खरेदी करण्यावर भर असतो.

काटपदराच्या साड्यांना मागणी
यंदाच्या दिवाळीत पुन्हा काटपदराच्या साड्यांना मागणी वाढली आहे. यामध्ये पैठणी, कांजीवरम, पेशवाई साड्यांची क्रेझ आहे. अगदी लो टु हाय बजेटमध्ये साड्या उपलब्ध असल्याने महिलांना खरेदीची संधी साधली आहे.
मिस-मॅच कपड्यांचा ट्रेण्ड

अलीकडे तरूणाई कपड्यांसोबत वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. कपाटातील एखादा सलवारसूट सतत घालायचा कदाचित कालांतराने कंटाळा येईल. पण त्याच सूटमधील कुर्ता वेगळ्या स्कर्ट किंवा लेगिंगसोबत घातला किंवा सलवार वेगळ्या लाँग शर्ट किंवा टॅग टॉपसोबत घालता येत असेल, तर मर्यादित कपड्यांसोबतसुद्धा कलात्मकतेने प्रयोग केलेले पाहायला मिळतात.

नक्षीकलेची चलती
दिवाळीतील महत्त्वाचा बदल म्हणजे नेहमीच्या जॉर्जेट, शिफॉनला बगल देऊन तरुणाई पारंपरिक कपड्यांना पसंती देऊ लागली आहे. सुदैवाने भारताला कॉटन, सुती, मलमल, लिनिन, सिल्क, रेशमी कापडांची फार जुनी परंपरा आहे. विशेष करून तरुण वर्गात सुती, लिनिन, मलमल अशा पारंपरिक कॉटन कापडांची मागणी वाढत आहे.

खादी कमबॅक
भारतीय दमट हवामानात चालणारी आणि राजकीय व्यक्तींमध्ये क्रेज असलेली खादी तर तरुणाईच्या गळ्यातील ताइतच बनली आहे. विशेष म्हणजे या कपडाच्या किमती आवाक्‍यात असल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडणार्या असतात. खादीचा कुर्ता, बांधनी इकत, बाटिक, सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

जुन्या कपड्यांना नवा लुक
आपण खरेदी केलेल्या कपड्याच्या मागे एखादी छानशी आठवण असेल, तर आपण तो जास्त जपून ठेवण्याचा प्रयत्ना करतो. उदाहणार्थ स्वतःच्या पैशातून खरेदी केलेल्या किंवा आपल्या आवडत्या सहलीवेळी आणलेला दुपट्टा असेत किंवा कोणीतरी खास व्यक्तीने दिलेला एखादा ड्रेस असेल. या गोष्टी थोड्याशा खराब झाल्या असतील, तर आपण दुरुस्तसुद्धा करतो पण लगेच टाकून द्यायचा विचार करत नाही. कारण, त्यांच्यामागे गोड आठवणी असतात. हे सर्व करत असताना या कपड्यांच्या किमती अधिक असतात. 

पण वर्षभरातून दोन-तीन महिन्यांनी होणारी खरेदी विरुद्ध नीट विचार आणि नियोजन करून गरजेनुसार केलेली खरेदी यांची तुलना केल्यास हा हिशोब फायदेशीर ठरू शकतो. जुन्या काटपदराच्या साड्यांपासून विविध प्रकारचे टॉप, ड्रेस, लहान मुलींच्या नऊवारी साड्यांची क्रेझ वाढली आहे. असे ड्रेस सणासुदीच्या काळात वेगळा लुक देऊन जातात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News