फॅशन डिझाईनिंग - सर्जनशीलता आणि प्रतिभा दाखवण्याची संधी देणारे क्षेत्र

प्रा. रेणुका घोसपुरकर
Tuesday, 15 September 2020

फॅशन डिझाईनिंग करिअर हे केवळ ग्लॅमरस लोकांना भेटणे किंवा श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींशी संवाद करण्यापुरतेच मर्यादित नाही. फॅशन डिझाइनमधील करिअर शैलीची भावना बाळगण्याचा विचार करणार्‍या मनाच्या सर्जनशील प्रतिभेस प्रोत्साहित करते. Fashion designing career is not limited to meeting glamorous people or interacting with rich and famous people. A career in fashion design encourages the creative genius of the mind to pursue a sense of style

फॅशन डिझाईनिंग - सर्जनशीलता आणि प्रतिभा दाखवण्याची संधी देणारे क्षेत्र

फॅशन डिझाईनिंग आजच्या काळात सर्वात आकर्षक, मोहक, भावणारा आणि उत्सुकता वाढवणारा असा करिअरचा पर्याय आहे.एका बाजूला लोकांच्या सर्जनात्मक आणि भौतिक गरजा भागविण्याचे, तर दुसऱ्या बाजूला प्रतिभावान लोकांना ग्लॅमर, यश, प्रसिद्धी आणि चांगले उत्पन्न देण्याची क्षमता फॅशन इंडस्ट्रीमध्ये आहे. जर आपल्याकडे सर्जनशीलता, शैलीची जाण आणि कल्पकता असेल तर हे क्षेत्र आपली वाट पाहत आहे.

- प्रा. रेणुका घोसपुरकर, विभाग प्रमुख, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी

भारतीय संस्कृतीत पेहरावाला फार महत्व आहे. विविध प्रकारच्या पेहरावातून ही संस्कृती समृद्ध होत गेली आहे. फॅशन डिझाईन ही पोशाख, पेहराव आणि जीवशैलीच्या साहित्य रचनेला वाहिलेली एक कला आहे. ही कला सांस्कृतिक आणि सामाजिक प्रभावाखाली असून, स्थलकालानुसार विकसीत होत गेली आहे. प्राचीन भारतीय राजेशाही परंपरेतून ही फॅशन डिझाईनची उत्पादने आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आज हे क्षेत्र अधिकच व्यापक होत गेले आहे. या क्षेत्रात करिअर करून आपल्यातील सर्जनशीलता आणि प्रतिभा दाखवण्याची संधी आपल्याला आहे.

अतिशय हुशार आणि सर्जनशील असलेल्या ही नवीन युवापिढी त्यांच्यातील सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी आणि फॅशन जगतात आपले स्थान निर्माण करण्यासाठी फॅशन इन्स्टियूटमध्ये प्रवेश घेण्यात रुची दाखवत आहेत. या युवकांमध्ये अतिशय नाविन्यपूर्ण आणि प्रतिभाशैली असल्याने ट्रेंडस अनुकरण करण्यापेक्षा ट्रेंड निर्माण करणारे बनत आहेत. अनेक नवीन डिझायनर्स अनुभवासाठी करिअर म्हणून काम करतात. या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी आहेत, परंतु, अनेकजण या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी त्यांच्यातील सर्जनशीलता आणि व्यवस्थापकीय कौशल्य यांचा मेळ घालणे आवश्यक ठरते.

फॅशन डिझाईनिंग करिअर हे केवळ ग्लॅमरस लोकांना भेटणे किंवा श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींशी संवाद करण्यापुरतेच मर्यादित नाही, तर जीवनशैलीच्या बाबतीत काटेकोर असलेल्या लोकांना आपल्या कल्पकतेतून समाधान देण्याचे काम करते. फॅशन डिझाइनमधील करिअर शैलीची भावना बाळगण्याचा विचार करणार्‍या मनाच्या सर्जनशील प्रतिभेस प्रोत्साहित करते.

काय शिकायला मिळते

- फॅशन इल्लूस्ट्रेशन

- पॅटर्नमेकिंग

- कंस्ट्रक्शन

- कपड्यांची ओळख

- फॅशन मार्केटिंग अँड कम्युनिकेशन

- टेक्स्टाईल्स अँड क्वॉलिटी अशुरन्स

- फॅशन रिटेलिंग

- सर्फेस ऑर्नामेंटेशन

- कॅड

- ट्रॅडिशनल टेक्स्टाईल

- ड्रेपिंग, आदी

या क्षेत्रातील महत्वाचा भाग म्हणजे कपड्यांचे डिझाईन, स्केचिंग, कापड कापणी, तुकड्याचे एकत्रित शिवणकाम आणि अंतिमतः विक्री. विविध शैलीची लोकप्रियता व विपणन आणि उत्पादनांना फॅशन शो आणि फॅशन लिखाणाच्या माध्यमातून होते. या दिवसांत फॅशनचे वाढत असलेले महत्व, कपड्यांत वैविध्य आणि स्थानिक बाजारात उत्पादनांची उपलब्धी यामुळे फॅशन डिझायनरला आणखीनच समृद्ध होणे शक्य होत आहे. आपल्या विशिष्ट भरतकाम पद्धती, सुंदर आणि श्रीमंत शिल्प, हातमाग फॅब्रिक्स, देहाती पोत आणि चमकदार रंगांसह जागतिक बाजारपेठेतील प्रमुख स्थान मिळवण्याचा फायदा भारत घेत आहे. भारतीय फॅशन डिझायनर्सनी भारतीय वसाहतींसाठी जागतिक बाजारपेठ तयार करण्यात मोलाचे योगदान दिले आहे.

काही फॅशन डिझायनर्स फ्रीलांस म्हणून काम करत आहेत. काहीजण व्यक्तिगत पातळीवर काम करत आहेत. किंवा डिझाइनर कपडे बनवून दुकाने किंवा कपडे उत्पादकांना पुरवले जातात. काही लोक फॅशन कंपनीसाठी काम करतात, तर काहीजण कंपनीचे डिझाईन करतात. काहीजण स्वतःचे फॅशन दुकान काढून त्यांच्या कल्पक आणि सुंदर डिझाईनची विक्री करतात. काही लोक निर्यात कंपन्यात, कापड गिरण्यात, बुटीक्समध्ये, कपड्यांच्या दुकानात, लेदर कंपन्यात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर काम करतात.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील करिअरच्या संधी:

- फॅशन डिझाइनर

- फॅशन कोऑर्डिनेटर

- फॅशन इलस्ट्रेटर

- फॅब्रिक टेक्नॉलॉजिस्ट

- फॅशन कन्सल्टन्ट

- फॅशन जर्नालिस्ट

- फ्रीलान्स डिझाइनर

- फॅशन स्टायलिस्ट

- प्राध्यापक

- बुटीक ओनर

- कॉस्ट्यूम डिझाइनर

- फॅशन इव्हेन्ट कोऑर्डिनेटर

- फॅशन कोरिओग्राफर

- फॅशन कटर

- ब्रँड स्टोअर मॅनेजर

- फॅशन फोटोग्राफर

- फॅशन एडिटर

- व्हिज्युअल मर्चंटायझर

- ज्वेलरी डिझायनर

- अपरेल डिझाइनर

- ऍक्सेसरीज डिझाइनर

- सेल्स असोसिएट

- पब्लिक रिलेशन्स स्पेशालिस्ट

- इन्व्हेंटरी प्लॅनर

- रिटेल बायर

- ग्राफिक डिझाइनर

- टेक्स्टाईल डिझाइनर

- क्रिएटिव्ह डिझाइनर

- क्वॉलिटी अश्युअरन्स मॅनेजर

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News