शेतकऱ्यांना विमा योजनेचे 247 कोटी मिळणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 22 May 2020

या योजनेमुळे एक लाख 64 हजार 917 कर्जदार शेतकऱ्यांचा, तर 85 हजार 460 बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा फायदा झाला.

मुंबई : फ्युचर जनरल इन्शुरन्सतर्फे प्रधानमंत्री फसल बीमा योजनेतील शेतकऱ्यांचे 276 कोटींचे दावे मान्य करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. या योजनेमुळे एक लाख 64 हजार 917 कर्जदार शेतकऱ्यांचा, तर 85 हजार 460 बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा फायदा झाला. महाराष्ट्रात अहमदनगर, बुलढाणा, नांदेड, सातारा आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांची पीकविम्याची रक्कम मिळाली. 

कर्नाटकातील सात जिल्ह्यांमधील, राजस्थानमधील सहा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली. यात 38 हजार 928 महिला शेतकऱ्यांना 44 कोटी 32 लाख रुपये थेट लाभार्थी खात्यात मिळाले. महाराष्ट्रातील 28 हजार 597 शेतकऱ्यांना 23 कोटी 96 लाख रुपये देण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News