शेतकऱ्याच्या आत्महत्याकडे दुर्लक्ष केले जाते का?

रसिका जाधव (सकाळ वृत्तसेवा - यिनबझ)
Wednesday, 19 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • अलिकडेच सुंशात सिंगने आत्महत्या केली आहे.
  • त्यात आत्महत्यावरून अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.
  • अनेक कलाकरांनी त्यांची मत व्यक्त केले आहे.

मुंबई :- अलिकडेच सुंशात सिंगने आत्महत्या केली आहे. त्यात आत्महत्यावरून अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेक कलाकरांनी त्यांची मत व्यक्त केले आहे. तर राजकारणी लोकांनी सुध्दा यात सहभाग घेतला आहे. परंतु जसे सुशांतच्या आत्महत्यावर केली जाते आहे. तशी शेतकऱ्यांने केलेल्या आत्महत्यावर कधीच कोणी प्रतिक्रिया देताना दिसत नाही. कोणीच शेतकऱ्यांच्या  आत्महत्येनंतर पुढे येऊन काही बोलत नाही. जो जगाचा पोशिंद आहे, त्याच्याकडे दुर्लक्षित केले जात आहे. सुंशात सिंगच्या आत्महत्यावर एवढ्या चर्चा केल्या जात आहेत परंतु जेव्हा शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा कोणीच चर्चा करत नाही म्हणजे जगाच्या पोशिंद्याला दुर्लक्ष केले जाते असे तुम्हाला वाटतं नाही का? याच विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपवर मनोसत्त्क चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

आपल्याकडे प्रत्येक घटना मग त्यामागे काही राजकीय कंगोरे असतील तर ती त्या त्या वेळी त्या राजकीय परिस्थितीच लाभ उठवला जातो शेतकरी आत्महत्या कोणी कानाडोळा केला अस अजिबात नाही सध्या विरोधी पक्षात असणाऱ्या पक्षाने कोणे एके काळी खूप सारे वातावरण निर्माण केले होते शेतकरी आत्महत्यांचे मी तर असे म्हणेल तो हि एक मुद्दा होता त्यांना सत्तेकडे घेऊन जाण्याचा ... परंतु सध्या नवा गडी  नव राज्य असं चालू आहे सुशांत आत्महत्या प्रकरण तापवत ठेवणे यामागे बिहार निवडणुका हे एक कारण आहेच तसेच सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांची नावे या मध्ये घेऊन सत्ताधारी पक्षाला अडचणी मध्ये आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न यामध्ये दिसून येत आहे .

-विनोद खराबे, पुणे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News