शेतकरी कन्येची थेट कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे धाव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 19 March 2020

सोमवारी (ता.16) दिव्याने कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन 'सुतार बर्डी' धरणाविषयी सविस्तर चर्चा केली आणि निवेदन दिले.

जळगाव: नापिकीला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. २० वर्षापासून रखडलेल्या 'सुतार बर्डी' धरणाचे काम तात्काळ सुरू करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती समन्वयिका दिव्या यशवंत हिने कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आणि शेतकऱ्यांचे थेट गऱ्हाणे मांडले.

सोमवारी (ता.16) दिव्याने सकाळी कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन 'सुतार बर्डी' धरणाविषयी सविस्तर चर्चा केली आणि निवेदन दिले. निवदेनाची तात्काळ दखल घेऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि जळगावचे पालकमंत्री तथा गुलाबराव पाटील यांच्याकडे 'सुतार बर्डी' धरणाने काम सुरु करण्यासाठी पत्रव्यवहार केला जाईल असे आश्वासन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.       

शेतकऱ्याची कन्या दिव्याने शेतमजूर, शेतकऱ्यांचे दु:ख जळवुन अनुभवले आहे. शेतकऱ्यांना दुष्काळापासून मुक्त करायचे असेल तर बारमाही पाण्याची सोय केली पाहीजे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात धरणे बांधली पाहीजे. तेव्हाच शेतकरी सुजलाम सुफलाम होईल आणि अवेळी पडणारा पाऊन, दुष्काळावर मात करता येईल अशी अपेक्षा दिव्याने व्यक्त केली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News