फरहान अख्तर लवकरच बांधणार लग्नगाठ ?  

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Thursday, 9 January 2020

तब्बल १५ वर्षांच्या संसाराचा निरोप घेऊन त्याने अधुनाबरोबर काडीमोड घेतला. त्यानंतर त्याचे नाव शक्ती कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांची कन्या श्रद्धा कपूर हीच्याबाबरोबर रिलेशनशीप मध्ये होता असे म्हणतात.

मुंबई : वयाची ४५ वर्ष पूर्ण करणारा फरहान अख्तर हा सध्या चांगलाच चर्चेत असून तो पुन्हा एकदा  लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे असे कळतंय. फरहान अख्तर ह्याचे हे दुसरे लग्न असून ह्याआधी तो अधुना बरोबर १५ वर्षे संसारात होता.

तब्बल १५ वर्षांच्या संसाराचा निरोप घेऊन त्याने अधुनाबरोबर काडीमोड घेतला. त्यानंतर त्याचे नाव शक्ती कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांची कन्या श्रद्धा कपूर हीच्याबाबरोबर रिलेशनशीप मध्ये होता असे म्हणतात.

श्रद्धा कपूर हिच्याबरोबर असलेले नाते हे फरहान अख्तर च्या घटस्फोटामागचे कारण असल्याचे सांगण्यात येते. पण दोघांनीही या गोष्टीला कधीच दुजोरा दिला नाही.

मात्र सध्या फरहान अख्तर हा त्याची मैत्रीण शिबानी दांडेकर हिच्याबरोबर रिलेशनशिप मध्ये असून लवकरच तो विवाहबंधनात अडकणार असल्याचं खात्रीलायक वृत्त त्याच्या निकटवर्तीयांकडून समजतंय.  

 

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News