चेस ऑफ लिजंडस्‌ स्पर्धेत चाहत्यांची पुन्हा  निराशा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 July 2020

 विश्वनाथन आनंदने चेस ऑफ लिजंडस्‌ स्पर्धेत चाहत्यांची पुन्हा घोर निराशा केली. त्याला या स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले.

मुंबई:  विश्वनाथन आनंदने चेस ऑफ लिजंडस्‌ स्पर्धेत चाहत्यांची पुन्हा घोर निराशा केली. त्याला या स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले. आनंदने बारा वर्षांपूर्वी व्लादिमीर क्रामनिकला हरवून जागतिक विजेतेपद जिंकले होते. आता त्याला क्रामनिकविरुद्ध चार डाव पूर्ण होण्यापूर्वीच पराभव पत्करावा लागला. जगज्जेता मॅग्नस कार्लसन आणि पीटर स्वीडलर यांच्याविरुद्धच्या चौथ्या डावात आनंदचा खेळ भक्कम आहे. तो आगळ्या चाली करीत प्रतिस्पर्ध्याला बेजार करीत आहे, असे वाटत असतानाच त्याच्याकडून चूक घडली होती.

या वेळी हे पहिल्या डावात घडले आणि आनंदला पराभव पत्करावा लागला. त्यातून सावरण्यापूर्वीच आनंदने दुसरा डाव गमावला. आनंदला लढतीतील आव्हान राखण्यासाठी तिसऱ्या तसेच चौथ्या डावात विजय हवा होता; पण क्रामनिकने तिसरा डाव बरोबरीत सोडवून 2.5-0.5 अशी विजयी आघाडी घेतली, त्यामुळे चौथा डाव खेळण्याची वेळही आली नाही.

खरे तर बुद्धिबळतज्ज्ञांच्या मते पहिल्या डावात सातत्याने बरोबरीची स्थिती दिसत असली, तरी आनंदला जिंकण्याची संधी होती. त्याने एकाच चालीत ऊंट आणि अश्वाचा मोबदला देण्याची तयारी दाखवतानाच प्याद्याचे वजिरात रूपांतर करण्याकडे वाटचाल सुरू केली. क्रामनिकने चांगला बचाव केला. सर्व
काही सुरळीत असताना आनंदची अश्वाची चाल चुकली आणि विजयी स्थितीतून तो पराजित झाला.

पहिल्या डावातील पराभवातून सावरणेच विश्वनाथन आनंदला अवघड गेले. त्यामुळे त्यानंतर फारसे आव्हान नव्हते.
- व्लादिमीर क्रामनिक

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News