मॅन वर्सेस वाइल्डमध्ये दिसणार 'ही' सुप्रसिध्द अभिनेत्री आणि क्रिकेटर   

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Friday, 31 January 2020
  • बेयर ग्रिल्सचा शो मॅन वर्सेस वाइल्ड जगभरात मोठ्या प्रमाणात पाहिला जातो.
  • वर्षानुवर्षे या कार्यक्रमात अनेक नामांकित व्यक्ती सहभागी झाल्या आहेत.

बेयर ग्रिल्सचा शो मॅन वर्सेस वाइल्ड जगभरात मोठ्या प्रमाणात पाहिला जातो. वर्षानुवर्षे या कार्यक्रमात अनेक नामांकित व्यक्ती सहभागी झाल्या आहेत. तथापि, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शोमध्ये आल्यापासून लोकांची आवड अधिक वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नंतर दक्षिण सुपरस्टार रजनीकांत चित्रपट सुष्टीतून येणारे पहिले सिलेब्रिटी आहेत.  

अक्षय कुमारदेखील या शोचा एक भाग असेल

अलिकडेच अक्षय कुमार शोमध्ये आल्याची बातमी पाहून चाहते बरेच उत्सुक आहेत. ते चित्रीकरणासाठी पोहोचले आहेत. आता अशी खबर आहे की, दीपिका पादुकोण आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीही या यादीमध्ये सामील होणार आहेत. अहवालानुसार दुसर्‍या आणि तिसर्‍या पर्वाचे चित्रीकरण या दोघांसह केले जाईल. आशी अपेक्षा आहे की, यात आणखी बरेच नामांकित चेहरे दिसू शकतात.

रजनीकांत यांचे चाहते उत्साहित 

लोकही रजनीकांत यांच्या एपिसोडची आतुरतेने वाट पाहत आहेत. रजनीकांत यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली होती की, बेयर ग्रिल्स त्यांना शोचा एक भाग बनवित आहे. कधीही न संपणाऱ्या अनुभवाबद्दल रजनीकांत यांनी बेयर ग्रिल्स यांना धन्यवाद देखील दिल्या आहेत.  

 

शो लोकप्रिय आहे

मॅन वर्सेस वाइल्ड ही एक सर्वाइवल टेलिविजन मालिका आहे. हा शो जगभरात बर्‍यापैकी लोकप्रिय आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News