एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरने फुलांचा वर्षाव होणारा 'तो' फोटो खोटा?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 5 May 2020

भारतीय वायुसेनेच्या (आयएएफ) विमान आणि हेलिकॉप्टर्सनी रविवारी कोरोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव केला होता. हे आरोग्य कर्मचारी, परिचारिका, डॉक्टर आणि कोरोनाव्हायरस विरूद्ध लढाई लढत असलेल्या सर्वांना प्रोत्साहित करण्यासाठी केले गेले होते. तसेच,आपण सगळे  त्यांच्याबरोबर असल्याचा संदेश देखील यातून द्यायचा होता

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेच्या (आयएएफ) विमान आणि हेलिकॉप्टर्सनी रविवारी कोरोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव केला होता. हे आरोग्य कर्मचारी, परिचारिका, डॉक्टर आणि कोरोनाव्हायरस विरूद्ध लढाई लढत असलेल्या सर्वांना प्रोत्साहित करण्यासाठी केले गेले होते. तसेच,आपण सगळे  त्यांच्याबरोबर असल्याचा संदेश देखील यातून द्यायचा होता. 

या इव्हेंटननंतर एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. लॉकडाऊन असल्याने अनेक लोकं आपल्या गावच्या दिशेने निघाले आहेत. कोणत्याही प्रकारे गाड्यांची व्यवस्था नसल्याने हे मजूर चालतच गावचा रास्ता तुडवत आहेत. या फोटोमध्ये खाली रस्त्यावरून हे मजूर आपलं सामान घेऊन जाताना दिसत आहेत. तर त्यांच्या मागे एअरफोर्सच्या विमानातून फुलांचा वर्षाव होताना दिसत आहे..हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. मात्र या फोटोबाबत जाणून घेतल्यावर सत्य समोर आले आहे. 

 

काय आहे व्हायरल पोस्ट
या मजूर आणि हेलिकॉप्टरच्या व्हायरल फोटोसोबाबत एक कॅप्शन देखील देण्यात आलं आहे, "असं म्हणतात की, एक फोटो हजार शब्दांच्या किंमतीचा असतो. त्याची किंमत एक लाख आहे. मला माहित नाही की कोणी क्लिक केले परंतु 2020 मधील प्रत्येक पैलू एकाच फ्रेममध्ये हस्तगत करण्यासाठी छायाचित्रकार पुरस्कारास पात्र आहे. इतिहास अशा फोटोनी बनलेला आहे."

काय आहे सत्य
या फोटोची पडताळणी केल्यास आपल्याला लक्षात येते की, हे दोन्ही फोटो वेगळे आहेत. ज्यांना एडिट करून एक करण्यात आले आहे. हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव होणारा फोटो वेगळा आहे. मुंबईत कोविड-१९ च्या वॉरियर्सला आयएएफने फुलांचा वर्षाव करून सॅल्यूट केला आहे. मात्र हा हेलिकॉप्टरचा फोटो २०१८ मधील आहे. २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी इंडियन एअरफोर्सकडून हा फुलांचा वर्षाव करण्यात आला होता. त्यावेळी हा फोटो अपलोड करण्यात आला होता. दरम्यान फोटोमधील मजूर दिसत आहेत, तो फोटो देखील लॉकडाऊननंतर मजूर स्थलांतर करतानाच आहे. १९ एप्रिल रोजी हा फोटो एका वृत्तवाहिनेच्या आर्टिकलमध्ये वापरण्यात आला होता. 

निष्कर्ष 
एअरफोर्सद्वारे हेलिकॉप्टरमधून मजुरांवर फुलांचा वर्षाव होणारा व्हायरल फोटो, हे दोन वेगवगेळे फोटो आहेत. याशिवाय हे दोन्ही फोटो जुने आहेत. या दोन्ही फोटोंना फोटोशॉपमध्ये एडिट करून व्हायरल करण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News