फडणवीसांचा घोटाळा उघड; इतक्या कोटींचा घोटाळा ? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020

मुंबई - फडणवीस सरकारच्या काळात सिडकोच्या आत्तापर्यंत झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचा ठपका कॅगने ठेवल्यानंतर कॉंग्रेसकडून फडणवीसांवरती जोरादार टिका केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी तर 'हा घोटाळा म्हणजे हिमनगाचे टोक' असल्याची टीका केली आहे. 

मुंबई - फडणवीस सरकारच्या काळात सिडकोच्या आत्तापर्यंत झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचा ठपका कॅगने ठेवल्यानंतर कॉंग्रेसकडून फडणवीसांवरती जोरादार टिका केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी तर 'हा घोटाळा म्हणजे हिमनगाचे टोक' असल्याची टीका केली आहे. 

फडणवीस सरकारच्या काळात 'सिडको'च्या झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून मोठा घोटाळा झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. फडणवीस सरकारने टेंडरच्या नावाखाली जनतेच्या पैशाची मोठ्या प्रमाणात लुट केली आहे. स्वच्छ आणि पारदर्शकतेच्या कामाचा झेंडा मिरवणा-या फडणवीस सरकारचा बुरका फाडल्याचे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले. 

सिडकोच्या माध्यमातून मुंबईत अनेक कामे सुरू आहेत. त्यापैकी नवीमुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळासह इतर कामात 2000 कोटीचा घोटाळा झाल्याचे कॉंग्रसचे म्हणणे आहे. फडणवीस सरकारच्या काळात सिडकोची सर्व कामे मुख्यमंत्री कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली झाले असून, 2000 कोटींचा घोटाळा झाला कसा ? असा सवालही काही नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा खरा चेहरा महाराष्ट्राच्यासमोर यायला हवा अशी कॉंग्रेसची मागणी आहे. 

विशेष म्हणजे काडीमात्र अनुभव नसलेल्या इसमाला ८९० कोटींचे सिडकोचे इतके मोठे काम कसे काय मिळाले. तसेच काम दिलेला व्यक्ती सिडकोचा अध्यक्ष कसा काय असा प्रश्नही आम्ही त्यावेळी सरकारला विचारला होता. परंतु तेव्हाच्या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. 

फडणवीस सरकारच्या काळात कॉंग्रेसच्या नेत्यांनी 20 प्रकरणात घोटाळा असल्याची माहिती सरकारला दिली होती. परंतु त्याची सरकारने कसलीही चौकशी केली नाही. प्रकरणातल्या सर्वांना क्लिनचीट देऊन टाकली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News