फडणवीस म्हणतात मी पुन्हा येईन; पण...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 3 May 2020

निवडणुकीच्या निकालानंतर युतीचं सरकार येईल यात शंका नव्हती. पण शिवसेनेला दिलेलं वचन पाळावं अशी शिका टिका शिवसेनेने वारंवार भाजपवर केली. त्यानंतर मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपने नकार दिल्यानंतर वातावरण आणखी गढूळ झालं. त्यातं फायदा झाला, तो कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा, महाविकास आघाडीचा नारा देत तीन्ही पक्ष एकत्र आले आणि सत्ता स्थापण केली.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्यावेळी मी पुन्हा येईन या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची विरोधकांनी सोशल मीडियावर चांगलीच टिंगल उडवली होती. निवडणुकीत जादुई आकडा मिळवूनही ठरावीक खाते मिळत नसल्याने युतीची सत्ता स्थापन झाली नाही. ही संधी साधत शिवसेनने कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापण केली. एका वृत्तपत्राला सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलाखत देत असताना फडणवीस म्हणाले की, जनता मला पुन्हा सत्तेत आणेल असा विश्वास वाटतोय, यामुळे 'मी पुन्हा येईन' या वाक्याला सोशल मीडियावर चांगलाच ऊत आला आहे. 

निवडणुकीच्या निकालानंतर युतीचं सरकार येईल यात शंका नव्हती. पण शिवसेनेला दिलेलं वचन पाळावं अशी शिका टिका शिवसेनेने वारंवार भाजपवर केली. त्यानंतर मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपने नकार दिल्यानंतर वातावरण आणखी गढूळ झालं. त्यातं फायदा झाला, तो कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा, महाविकास आघाडीचा नारा देत तीन्ही पक्ष एकत्र आले आणि सत्ता स्थापण केली.

दिलेल्या मुलाखतीमध्ये ५ वर्षाच्या काळात केलेल्या कामाचा पाढा वाचला, तर केलेली महत्त्वाची काम सुध्दा त्यांनी आवर्जुन सांगितली. २०१४ च्या निवडणुकी आगोदर दिलेल्या ८० आश्वसनांनी पुर्तता केली. त्याचबरोबर उरलेली २० टक्के कामे मार्गी लागण्यात सरकार यशस्वी झाले आहे असंही त्यांनी मुलाखतीत सांगितलं. तसेच मराठा आरक्षण, शेतक-यांचं १९ कोटी रूपयांचं कर्ज माफ असे अनेक प्रश्न मार्गी लावल्याचे सुध्दा त्यांनी सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News