माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा संपन्न

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

पालघर : येथील जीवन विकास शिक्षण संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष शिक्षण महर्षी दिवंगत स. तु. कदम यांच्या १३ व्या स्मृतिदिना निमित्त रविवारी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक, गुणवंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी गौरव पुरस्कार वितरण सोहळा झाला. एस. टी. कदम इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जीवन विकास शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष वागेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. 

कार्यक्रमास खासदार राजेंद्र गावित, ठाणे महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, पालघर पालिकेच्या नगराध्यक्षा उज्ज्वला काळे, जीवन विकास संस्थेच्या अध्यक्षा अमृता खामकर, संस्थेचे कोषाध्यक्ष प्रणव कदम, संस्थेचे कार्यवाहक रवींद्र कदम उपस्थित होते. या वेळी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार उमेश गजानन पाटील (केव हायस्कूल, विक्रमगड), गुणवंत शिक्षक पुरस्कार कामिनी प्रफुल्ल राऊत (माध्यमिक आश्रम शाळा, शिगाव), उत्कृष्ट सेवा पुरस्कार गजानन रामचंद्र समेळ (शिक्षकेतर कर्मचारी स. तू. कदम विद्यालय पालघर), गुणवंत माजी विद्यार्थी पुरस्कार डॉ. जितेंद्र संखे, कृष्णकांत गडग, खुशाल किणी, मनोज श्रीधर पाटील यांना देऊन सन्मानित केले. कार्यक्रमास पालघर जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी माध्यमिक शाळा पतपेढीचे संचालक मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॅरेल डिमेलो तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते.  सूत्रसंचालन जीवन विकास कला क्रीडा मंडळाचे कोषाध्यक्ष रवींद्र नाईक; तर आभार गणेश प्रधान यांनी केले.

या वेळी खासदार राजेंद्र गावित यांनी ग्रामीण भागात शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दूरदृष्टी ठेवून स. तू. कदम यांनी पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी खेड्यापाड्यात शाळा सुरू करुन शिक्षणाची गंगा घरोघरी नेली. 
सामाजिक, राजकीय क्षेत्रातही त्यांनी भरारी घेतल्याचे सांगत त्यांचा गौरव केला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News