फेसबुकवरचं प्रेम पडलं महागात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 February 2020
  • तिला नेहमी भेटायला बोलवून त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले त्यांना समजलच नाही. ती बऱ्याचदा त्या तरुणाला भेटत राहिली

मथुरा :  भारतात हल्ली सोशल मीडियाचा वापर जास्त होताना आपल्याला आढळतो. उत्तर प्रदेशमध्ये अश्याच प्रकारे फेसबुक वर मैत्री करणं तरुणीला चांगलाच त्रासदायक ठरलं आहे. फेसबुक वर मैत्री केलेल्या त्या तरुणीला त्याने भेटायला बोलवून तिला औषध देऊन तिला बेशुद्ध केलं. त्या पुरुषाने तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर तिला रेल्वे स्थानकावर सोडून तो तेथून पळून गेला. त्या महिलेने संपूर्ण माहिती सांगितल्यानंतर जीआरपीला धक्का बसला.  

पोलिसांनी रेल्वे चाईल्ड लाईन व महिला हेल्पलाईनला बोलवून त्यांच्या ताब्यात दिल. फेसबुक वापरणं जेवढं सोप आहे तेवढं त्रासदायक आहे. त्याने या आगोदर एका महिले सोबत मैत्री केली होती आणि तिला नेहमी भेटायला बोलवून त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले त्यांना समजलच नाही. ती बऱ्याचदा त्या तरुणाला भेटत राहिली आणि असा एक दिवस आला कि तरुणाने त्या महिलेला बेशुद्ध पाडण्याचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. 

पोलिसांनी त्या व्यक्तीसोबत संवाद साधायला सुरुवात केली तेव्हा त्या महिलेने सांगितले कि मुकेश राणा नावाच्या व्यक्तीसोबत मैत्री करून त्यांच्या प्रेमात पडले. तिचा प्रियकर सैन्यात असल्याचं त्या महिलेने सांगितलं. त्याने तिला १६ तारखेला बोलवून शारीरिक संबंध ठेवल्यावर मला मारहाण केली. त्यानंतर त्याने माझ्यासोबत त्याने ४ वर्ष शारीरिक संबंध ठेवले आणि माझ्यावर अत्याचार केला. नंतर त्याने मला सोडले. त्या आरोपीच लग्न झालेलं असून तो भरतपूरचा होता. मला मारहाण करून तो पळून गेला आणि त्याने माझा फोन फोडून सर्व पुरावे मिटवले. महिलेने जीआरपीमध्ये तक्रार केली होती म्हणून पोलिसांनी त्याचा तपास पुढे सुरु केला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News