फेसबुक मैत्री पडू शकते महागात 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

 प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे तर जीओमुळे प्रत्येकांकडे मुबलक इंटरनेट सुविधा आहे. अशातच सोशल मीडियाने युवा पिढीवर आपले मोहजाळ टाकले आहे.

नागपूर - प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे तर जीओमुळे प्रत्येकांकडे मुबलक इंटरनेट सुविधा आहे. अशातच सोशल मीडियाने युवा पिढीवर आपले मोहजाळ टाकले आहे. मात्र, काही युवक फेसबूकवरून मुलींना फ्रेंड्‌स रिक्‍वेस्ट पाठवून मैत्री करतात. नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करीत असल्याची धक्कादायक माहिती नागपूर पोलिसांकडील नोंदींवरून समोर आली आहे. 
गेल्या पाच महिन्यांत फेसबुकवरून मैत्री केल्यानंतर बलात्काराची १२ प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी फेसबूक फ्रेंड्‌सवर बलात्काराचे गुन्हेही दाखल केले आहेत. मोबाईलमध्ये फेसबुक सुविधा असल्यामुळे नवखेपणा म्हणून अनेक मुली कुणी ओळखीचे नसतानाही फ्रेंड्‌स रिक्‍वेस्ट पाठवतात. तर काही युवक मुलींचा फेसबुकवरून शोध घेऊन फोटोला लाईक करणे, चांगल्या कमेंट्‌स करणे असे प्रकार करतात.
त्यानंतर मॅसेजिंग ॲपवरून मुलींशी चॅटिंग करीत तिला हळूहळू प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. तिचा मोबाईल क्रमांक मिळविल्यानंतर भेटी घेणे  तसेच तिला महागडे गिफ्ट देण्याचे प्रकार घडलेले आहेत. ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे... तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही.’ असे भारी डॉयलॉग मारल्यानंतर भावुक 

फेसबूक मैत्री पडणार महागात 

असलेल्या मुली  प्रेमांत आकंठ बुडतात. अशा मुलींच्या विश्‍वासाचा गैरफायदा घेऊन मित्राच्या रूमवर किंवा लॉजवर नेऊन बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. असे युवक शारीरिक संबंधाचे मोबाईलने शूटिंग करणे, अश्‍लील फोटो काढणे, यासारखे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे मुली कायमच्या जाळ्यात अडकून पडतात. 

मुलींनो... हे करा

- अनोळखी व्यक्‍तीची फ्रेंड्‌स रिक्‍वेस्ट स्वीकारू नका.
- कुणाच्याही फोटोवर लाईक किंवा कमेंट करू नका.
- कुणी कमेंट्‌स दिली तर लगेच रिॲक्‍ट होऊ नका.
- कुणी उगाच चॅटिंग करीत असेल तर त्याला ब्लॉक करा.
- वारंवार फोटोवर कमेंट्‌स करीत असल्यास त्याला अनफ्रेंड करा.
- फेसबूकवर प्रोफाईल फोटो लॉक करून ठेवा.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News