मोबाइलचा अतिरेक एक न सुटणार व्यसन 

स्वप्नील नावडकर
Sunday, 29 December 2019

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मोबाइलहे करमणुकीचे साधन होऊन बसले आहे.मात्र ह्याचा होणारा  अतिवापर हे एक प्रकारचे न सुटणारे घातक व्यसन ठरतंय. मोबाईलच्या अतिवापराचे आजकालच्या तरुणाईवर दूरगामी परिणाम होताना दिसून येत आहेत. मोबाईलच्या माध्यमातून होणारा परिणाम हा शारीरिक आजारांना तर आमंत्रण देतच आहे मात्र याजोडीने  काही मानसिक व्याधीही जडल्याचे दिसून येत आहे.

मोबाइलमुळे  आजकालची तरुणाई एक एकलकोंडी आणि स्वतःमध्ये सतत गुंतून  राहणारी ठरत आहेत. मोबाईलचा तसेच सोशल मीडियाचा अतिरेकी वापर अनेक मानसिक आजारांना निमंत्रण देतोय.त्यामुळे आजकालच्या तरुणाईच्या जीवनशैलीचा दर्जा देखील घसरत चाललाय.

     लहान मुलांमध्ये मोबाईलचा वाढता वापर हि तर दिवसेंदिवस गंभीर होत चाललीय. लहान मुलांमध्ये ह्या गोष्टीच तर व्यसनच जडल्याच दिसून येत आहे. सतत स्मार्ट फोनमध्ये एकाग्र राहिल्याने मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढतेय.

मुल हि स्वतःच्या बालपणातच चुकीच्या गोष्टींच्या आहारी जात आहेत. मूल हि बालवयातच त्यांचे बालपण हरवून बसतायत. पोर्नोग्राफीचा स्मार्टफोनच्या माध्यमातून होणारा वापर हा तर  बालवयातील लहान मुलांच्या मानसिकतेचा एक प्रकारचा कर्करोगच म्हणायला हवा.

ह्या सर्व भीषण समस्यांशी दोन हात करण्यासाठी आजकालच्या पालकांना सुद्धा आपापल्या मुलांनकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे पालकांकडे आपल्या पाल्यासाठी नसणारा वेळ हि एक प्रकारची हतबलता म्हणायला हवी.त्यामुळे मुलांच्या होणाऱ्या जडणघडणीत पालकांच्या भूमिकेचा अनंन्यसाधारण वाटा हरवत चाललाय हे नक्की.    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News