अतिरिक्त स्क्रीनटाईम म्हणजे आरोग्याचा खेळखंडोबाच!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019

वाशीम: मुलांमधील मोबाईलचं वेड आता ‘घरघर की कहानी’ झालं आहे. मुलं आपला अधिकाधिक वेळ हा मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप किंवा टॅबवरच घालवितात... मुलांचे हे व्यस्त राहणं पालकांना गोड वाटत असलं तरी ते मुलांचा क्रिएटिव्ह वेळ अन् आरोग्य खात असल्याचं वास्तव आहे. सदृढ समाज घडवायचा असेल तर मुलांना मोबाईल, टीव्हीपासून मुक्ती देण्याची गरज व्यक्त होत असून निदान त्यांना भल्या-बुऱ्याची जाण करून देणं पालकांचं कर्तव्य आहे. यासाठी पालकांनी सर्वप्रथम स्वतःचा स्क्रिन टाइम कंट्रोल करणं आवश्यक झालं आहे. 

खरं तर डिजिटल जगात वावरणारी मुलं हा आई-वडिलांचा सध्या सर्वांत चर्चेचा विषय आहे. अनेकांच्या तर तो अभिमानाचाही विषय झाला आहे. माझ्यापेक्षा माझं मुल मोबाईल हाताळण्यात किती एक्स्पर्ट आहे, हे मोठ्या अभिमानाने पालक सांगतात. लहान बाळांना खुळखुळ्याऐवजी मोबाईवरील एखादं गाणं दाखवून चूप केलं जात आहे. बालपणापासूनचे अशा पद्धतीनं सतत स्क्रिनवर राहिल्यानं मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. मोबाईल, टीव्हीमधून मुलांना जे मिळतं त्यातून मुलं अधिक हिंसक आणि असंवेदनशिल बनत आहेत. मुलांना आप्तांपेक्षा गॅजेट्समध्ये राहणे अधिक आवडू लागलं आहे... हे कौटुंबिक वातावरण आणि नात्यांची विण निर्माण करण्यास अडसर ठरते आहे. 
मुलांमधील मोबाईल वेडानं त्रस्त झालेल्या पालकांपुढे हे व्यसन कसं सोडवायचं हा मोठा प्रश्न आहे. पालकांनी थोडे प्रयत्न केले तर ते सहज शक्य आहे. मुलांसोबत क्रिएटिव्ह वेळ घालणं आणि त्यांच्याशी खेळल्यास, मुलांना बाहेर फिरायला नेल्यास मोबाईल वेडापासून मुलं सहज दूर होतात. त्यांना अधिकाधिक समवयस्क मित्र बनविण्यात मदत केल्यास ते सहज शक्य असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे...
स्क्रिन टाईम म्हणजे काय ?
मोबाईल, टॅब, टीव्ही, लॅपटॉप, कम्प्युटर यावर आपण जेवढा वेळ घालवितो त्याला स्क्रिन टाइम म्हणतात. मुलं तर दिवसरात्र स्क्रिनसमोर असणं हा आपला हक्कच समजून स्क्रिनला चिकटलेले असतात. यावर जेवढा वेळ जाईल तो स्क्रिन टाइम म्हणून गणला जातो. आता तर मोबाईलमध्ये स्क्रिन टाइम मोजणारी ॲपही आली आहेत. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News