उच्च आणि तंत्रशिक्षण सीईटी अर्जाला मुदतवाढ; अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना शेवटची संधी

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा- यिनबझ)
Saturday, 5 September 2020

रविवारी रात्री १२ नंतर अर्ज भरण्यास सरुवात होणार आहे. तर मंगळवारी रात्री ११.५९ पर्यंत अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती स्टेट कॉमन इनट्रन्स टेस्ट सेलने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. 

मुंबई : प्रोफेशनल एज्युकेशन घेऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली. बारावी नंतर उच्च आणि तंत्रशिक्षण घेण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या सीईटी अर्जला मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सीईटीसाठी अर्ज भरण्याची संधी मिळणार आहे. रविवारी रात्री १२ नंतर अर्ज भरण्यास सरुवात होणार आहे. तर मंगळवारी रात्री ११.५९ पर्यंत अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती स्टेट कॉमन इनट्रन्स टेस्ट सेलने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अनेक उमेदवारांना सीईटी परीक्षेसाठी अर्ज करता आले नाही, काहीनी शुल्क भरण्यास उशीर झाला, त्यामुळे अनेक विद्यार्थी सीईटी अर्ज भरण्यापासून वंचित राहिले. अशा विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा संधी उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी पालकांनी सीईटी सेलकडे केली. या मागणीचा विचार करुन सीईटी सेलने दोन दिवस अर्ज प्रक्रीया वाढवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

या अभ्यासक्रमासाठी द्यावी लागणार  सीईटी

 • एलएलबी ३ आणि ५ वर्षे अभ्यासक्रम
 • बी,एड्, आणि बी.एड् ईएलसीटी
 • एम. एड्
 • बी. पी. एड्
 • एम. पी. एड्
 • बी. ए. बी. एड्, बी एसस्सी. बी. एड्
 • बी. एचएमसीटी
 • एम. एचएमसीटी
 • एम. एआरसीएच
 • एमसीए

अर्ज कोठे करावा

 • खाली दिलेल्या दोन्ही संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करता येतो.          
 • www. mahacet.org
 • http://celcell.mahacet.org

अर्ज करण्याचा कालावधी

 • मंगळवार ७ सप्टेंबर २०२० वेळ: 00.00 ते ८ सप्टेंबर २०२० वेळ : ११. ५९

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सुचना

 • ज्या विद्यार्थ्यांनी पु्वी फार्म भरला आहे त्यांना पुन्हा फार्म करण्याची आवश्यकता नाही
 • पुर्वी भरलेल्या फार्ममध्ये एडीट करता येणार नाही. आणि परीक्षा केंद्र बदलता येणार नाही
 • ज्या विद्यार्थ्यांचा फार्म चुकला आहे त्यांना नव्याने फार्म भरावा लागेल, मात्र पु्र्वी भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही.
   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News