अभिनेता राणा दग्गुबतीची चित्रपट ‘भुज’मधून एक्झिट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 10 January 2020

मात्र परिणीती चोप्रा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होती. तिने काही दिवसांपूर्वीच या चित्रपटामधून काढता पाय घेतला. आता तिच्या पाठोपाठ अभिनेता राणा दग्गुबतीनेही ‘भुज’ला रामराम केला आहे.

अजय देवगणच्या आगामी महत्त्वपूर्ण चित्रपटामधील आणखी एक चित्रपट म्हणजे ‘भुज ः द प्राईड ऑफ इंडिया’. १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटासाठी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेल्या चेहऱ्यांची निवड करण्यात आली होती.

मात्र परिणीती चोप्रा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होती. तिने काही दिवसांपूर्वीच या चित्रपटामधून काढता पाय घेतला. आता तिच्या पाठोपाठ अभिनेता राणा दग्गुबतीनेही ‘भुज’ला रामराम केला आहे.

या चित्रपटात राणाच्या वाट्याला बरेच ॲक्‍शन सीन्स होते. मात्र त्याची तब्येत ठिक नसल्याने चित्रीकरणादरम्यान डबल बॉडीचा वापर करून अभिनेत्याचा शोध सुरू आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News