परीक्षा विद्यापीठाच्या कि अंगणवाडीच्या?

जनार्दन धनगे
Saturday, 24 October 2020

कोरोनाकाळात परीक्षांचा अट्टहास,मग नियोजन का नाही? असाही सवाल आता विद्यार्थी संघटना उपस्थित करत असून याबाबत संघटनांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी लेखी स्वरूपात तक्रारी केल्या आहे. शेवटच्या वर्षातील या परीक्षा राज्यांतील नामवंत विद्यापीठाच्या कि अंगणवाडीच्या, असाच प्रश्न आता निर्माण झालाय.

परीक्षा विद्यापीठाच्या कि अंगणवाडीच्या?

उच्च न्यायालयाच्या निकालानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठांकडून पदवी तसेच पदवित्तर या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेतल्या जात आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सदर परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एका खासगी संस्थेची निवड करण्यात आली आहे. विविध महाविद्यालयीन केंद्रांमध्ये सुरु असलेल्या या परीक्षेमध्ये तसेच ऑनलाइन परीक्षेमध्ये विविध प्रकारच्या समस्यांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.

काही ठिकाणी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका तर काही ठिकाणी परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकाच वेळेत प्राप्त न झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांना त्रास सहन करावा लागत आहे.विविध परीक्षा केंद्रांवर तृतीय वर्ष कला या वर्गाचा राज्यशास्त्र विशेष पेपर ४ आंतरराष्ट्रीय राजकारण हा विषय मराठी माध्यमातून असूनही विद्यापीठाकडून सुरवातीस इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका सोडविली त्यानंतर तब्बल एक तासाने मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका मिळाल्यावर सुरुवातीला मिळालेल्या इंग्रजी व नंतर मिळालेल्या मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत कसलेही साम्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. तसेच आम्ही इंग्रजी माध्यमातून सोडविल्या प्रश्नपत्रिकेचे योग्य मूल्यमापन होईल का? अशी शंका विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

हे कमी कि काय विद्यापीठ परीक्षा विभाग व संबधित परीक्षा प्रणालीचा सावळा गोंधळ येथेही संपत नाही,त्यानंतर झालेल्या एम. ए. मराठीच्या प्रसारमाध्यम व मराठी साहित्य या पेपरमध्ये तर चुकांचा पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले.वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणाऱ्या या पेपर मधून काही प्रश्नाचे चार पैकी  दोन पर्यायच नसल्याचे पाहायला मिळाले.

विद्यापीठाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देण्याचे आवाहन करण्यात आले होते.मात्र आता त्याच ऑनलाइन स्वरूपाच्या परीक्षा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानाला व मानसिक त्रासाला कारणीभूत ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

संबंधित परिक्षार्थींच्या विविध शंका असतानाच प्राध्यापक व परीक्षा विभागातील मंडळींन पुढे विद्यार्थ्यांना काय उत्तर द्यावे हा पेच आहे.त्यामुळे विद्यापीठाच्या या परीक्षा प्रणालीच्या गोंधळातून महाविद्यालयांनी केव्हाच काढता पाय घेतलाय.विद्यार्थ्यांनी विद्यापीठाशी संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्याल्याकडून करण्यात येत आहे.

विविध महाविद्यालयाच्या परिक्षार्थीनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता,विद्यापीठासोबत तसेच परीक्षा विभागाशी संपर्क होत नसून आपण विद्यापीठाला वेळोवेळी केलेल्या ई-मेल ला विद्यापीठ स्तरावरून कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

कोरोनाकाळात परीक्षांचा अट्टहास,मग नियोजन का नाही? असाही सवाल आता विद्यार्थी संघटना उपस्थित करत असून याबाबत संघटनांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी लेखी स्वरूपात तक्रारी केल्या आहे. शेवटच्या वर्षातील या परीक्षा राज्यांतील नामवंत विद्यापीठाच्या कि अंगणवाडीच्या, असाच प्रश्न आता निर्माण झालाय.

विद्यार्थी संभ्रमावस्थेत

ज्या परीक्षा प्रणालीत विविध स्वरूपाच्या आश्चर्यकारक त्रुटी राहत असतील ,त्या ठिकाणी सदर परीक्षेचे योग्य मूल्यमापन होईल का?याची भीती विद्यर्थ्यांच्या मनामध्ये आहे.

 

विद्यार्थी म्हणतात...

"विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा देण्याचे आवाहन केले त्यानुसार ऑनलाइन परीक्षा देत आहोत.अनेक अडचणी येत आहे,प्रश्न दिसत नाही,कधी पर्याय पूर्ण नसतात,या व इतर समस्या येत असताना.शैक्षणिक वर्ष वाया गेल्यास जाबाबर कोण?हाच प्रश्न आहे.
एकनाथ कोऱ्हाळे (स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालय)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासोबत विद्यार्थ्यांनी कोणत्याही महत्वाच्या कामासाठी कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचा पर्यंत केल्यावर संपर्क होण्यास अनेक प्रकारच्या अडचणी येतात.

- सागर घोडेराव (कला व वाणिज्य महाविद्यालय येवला)

या वर्षीच्या परीक्षांना आधीच कोरोनाचे ग्रहण होते,परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षण व्यवस्थेबद्दल असणारा आदर कमी होतोय.
- महेश कोल्हे .कला व वाणिज्य महाविद्यालय येवला

विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार घडल्यास त्यावर कडक कारवाईची भाषा करणाऱ्या विद्यापीठाने  आता..आपल्या परीक्षा प्रणालीच्या क्षमतांचा विचार करणे गरजेचे आहे.या सर्व गोंधळात काही कर्मचारी दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी.

- सागर वाघ (एस. एन. डी. महाविद्यालय येवला)

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षा या नवीन असून,विद्यापीठाकडे मागणी करून देखील प्रश्नपत्रिका संच उपलब्ध झाले नाही,हजारो रुपये फी घेता मग सेवेच्या हमीचे काय.?
 रवींद्र सोनवणे (विद्यार्थी प्रतिनिधी नाशिक)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News