केंद्रीय परिषदेच्या सुचनांचा विचार करुन परीक्षेचा निर्णय घेतला जाईल: डॉ. दिलीप म्हैसेकर

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा- यिनबझ)
Tuesday, 12 May 2020

फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंची 'यिनबझ'साठी खास मुलाखत घेण्यात येत आहे. मंगळवारी (ता.12) नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी कुलगुरूंनी 'विद्यार्थ्यांना लॉकडाउनच्या काळात हे कराचं' या विषयांवर तरुणाईशी संवाद साधला. 

विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांचा विचार करुन आम्ही एक आहवाल तयार केला. केंद्रीय परिषदेकडे तो अहवाल सादर केला. केंद्रीय परीषद त्यावर विचार करुन परीक्षेसंदर्भात काही सुचना करतील. त्या सुचनांचा विचार करुन परीक्षेसंदर्भात निर्णय घेतला जाईल, तो निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा असेल असा विश्वास  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर सकाळच्या 'यिनबझ'च्या फेसबुक पेजवरती यांनी व्यक्त केला. 

फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंची 'यिनबझ'साठी खास मुलाखत घेण्यात येत आहे. मंगळवारी (ता.12) नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी कुलगुरूंनी 'विद्यार्थ्यांना लॉकडाउनच्या काळात हे कराचं' या विषयांवर तरुणाईशी संवाद साधला. 

होमीओपॉथिक, आयुर्वेदीक, मेडीकलचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या संकेत स्थळावर तज्ज्ञ प्राध्यापकांचे व्हिडीओ लेक्चर अपलोड केले आहेत. अभ्यासाकरिता व्हिडीओ लेक्चर उपयोग विद्यार्थ्यांनी करावा. अभ्यासाबाबत निर्माण होणारे प्रश्न, समस्या यांचा इमेल विद्यापीठला करावा, त्या समस्या तात्काळ सोडवल्या जातील असे म्हैसेकर यांनी सांगितले. प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या परिचारिका, डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार, पत्रकार यांचे आभार मानले. 

लोकडाउन काळात विद्यार्थ्यांनी काय करावे?

लोकडाऊन काळात रुग्णांची सेवा करण्यासाठी परीचारिका आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी आपले काम अविरतपणे चालू ठेवावे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरु ठेवावा. एकमेकांसोबत चर्चा करुन अभ्यास करावा. विद्यार्थ्यांना अडचण आल्यास विद्यापीठासी संपर्क करावा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News