कोरोना काळात परीक्षा अशक्य: उदय सावंत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 July 2020
  • युजीसीला लिहले पत्र; दोन ते तिन दिवस प्रतिक्रीयेची वाट पाहणार 

मुंबई : सप्टेंबरमध्ये परीक्षा आयोजन संदर्भात युजीसीने राज्यांना मार्गदर्शन सुचना दिल्या. मात्र, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेणे शक्य नाही अशी माहिती राज्य सरकारने पत्राद्वारे युजीसीला कळवली. यावर युजीसीकडून काय प्रतिक्रीया येते याची वाट पुढील दोन ते तीन दिवस पाहणार आहोत, असे मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सावंत व्यक्त केले.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर विरोधी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी टीकेची झोड उठवली. त्यांना उदय सावंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना प्रतिउत्तर दिले. कुलगुरुंना विश्वासात न घेता राज्य सरकराने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असा आरोप केला जातो, मात्र हा आरोप चुकीचा आहे. 

२९ एप्रिल रोजी युजीसीने राज्य सरकारला मार्गदर्शन सुचना दिल्या होत्या. राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहून राज्य सरकार आणि विद्यापीठांनी मिळून निर्णय घ्यावा असे सांगण्यात आले. कृषी विद्यापीठ सोडून सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंची मिटींग २ मे ला आयोजिक करण्यात आली होती. यावेळी परीक्षा संदर्भात कुलगुरुंची एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने ६ मे रोजी आपला आहवाल राज्य सरकारला सादर केला. राज्य सरकारने त्यावर विस्तूत चर्चा करुन ८ मे रोजी अहवाल स्विकारला. आणि अंतिम वर्गाच्या सर्व परीक्षा रद्द करण्यासाठी युजीसीने सहमती द्यावी असे पत्र पाठविले. मात्र युजीसीने यावर कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा २५ मे आणि २९ मे या तारखेला कुलगुरुंची मिटींग घेतली. आणि सविस्तर चर्चा केली. कुलगुरुंनी अनेक पर्याय सुचविले. त्यांचा विचार करुन ३० मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुलगुरुंशी संवाद साधला. कुलगुरुंची मते जाणून घेतली.

 

कोरोना काळात परीक्षा घेणे शक्य आहे का? याचा आढावा घेण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन समितीसोबत चर्चा केली, राज्यातील गंभीर परिस्थिती पाहता परीक्षा रद्द कराव्यात अशा सुचना व्यवस्थापन समितीने दिल्या. त्यानंतर व्यवसायिक आणि बिगरव्यवसायिक वर्गाच्या परीक्षा रद्द करण्यासाठी शिखर परिषदेला पत्राद्वारे  परवाणगी मागीतली. मात्र शिखर परिषदेने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांनतर आम्ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असे सावंत यांनी सांगितले. युजीसी सोबत केलेल्या पत्र व्यवहाराच्या झेरॉक्स प्रति, आणि कुलगुरुंसोबत झालेल्या मिटींगचे काही व्हिडीओ माध्यमांनसमोर सादर केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News