परिक्षाचा गोंधळ : आमचा विचार करणार की नाही?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 21 July 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत.
  • कोरोनाच्या संकटामय काळात महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत यूजीसीच्या निर्णयाविरोधात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.   

मुंबई:-  कोरोनाच्या संकटामय काळात महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत यूजीसीच्या निर्णयाविरोधात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अंतिम परीक्षेवरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकारमधील संघर्ष अधिकच तीव्र होऊ लागला आहे. गेल्या अनेक दिवसापासून यावर चर्चा होत आहे.

 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्र सरकार, युजीसी आणि आता युवासेना सर्वजण शेवटच्या वर्षाच्या परिक्षा घ्यायच्या का नाही? यावरून सकारात्मक नकारात्मक अग्रेसर आहेत. या विषयामुळे विद्यार्थी आणि पालक मात्र खूप अडचणीत सापडले आहेत.  

 

कोरोनामुळे आपल्या भागात परिक्षा घेणे शक्य नाही. हे सांगूनही युजीसी आणि केंद्र सरकार ऐकायला तयार नाही. परिक्षा घ्यायच्या का नाही.? या विषयावर नाही म्हणून शिका बसत नाही, ना हो म्हणून.? याच विषयाला घेवून आज यीनबझच्या अनेक ग्रुपवर चर्चा झाली. तरुणाई मनसोक्तपणे या विषयावर व्यक्त झाली. काही निवडक मत खालीलप्रमाणे देत आहेत. सर्वांची मत देता आली नाहीत.

 

पूजा आकरे

 

विद्यार्थी आणि पालक आताही संभ्रमात् आहेत. एक मत करून योग्य तो निर्णय घ्यायला हवा रद्द म्हणून सांगतात, पुन्हा परिक्षा घ्यायची म्हणून सांगतात. पुन्हा राज्यपाल म्हणतात की, अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार. विद्यार्थ्यांच जीवाच आणि त्यांच्या पुढील आयुष्याच् प्रश्न आहे. सगळीकडून याचा खेळ करून ठेवल्यासारख वाटत आहे.    

 

प्रिया मोहिते

 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या काळात परीक्षा घेणे अयोग्यच… निदान जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही तोपर्यंत तरी परीक्षा घेऊ नयेत.

 

स्वप्नील भालेराव

 

राज्य सरकार, केंद्र सरकार आणि युजीसी यांच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. परीक्षा होणार की नाही? याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. हा संभ्रम दूर करणे युजीसी आणि सरकारची जबाबदारी आहे. मात्र, परीक्षेवरून केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण करत आहेत. यामध्ये विद्यार्थी भरडला जात आहे. कोर्टाने या सर्व बाबींचा विचार करून लवकर निर्णय घ्यावा.

 

साक्षी साळुंखे

 

एखादा निर्णय पूर्णपणे विचारपूर्वक घेतल्या शिवाय तो विद्यार्थ्यांपर्यंत येऊ देऊ नये त्याने विद्यार्थी गोंधळून जातात.

 

महेश घोलप

 

कोरोनामुळे जगभरात लॉगडाऊन आहे, सगळीकडे ऑनलाइन शिक्षण पद्धत सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि भविष्याचा विचार केल्यास परीक्षा घेणं योग्य ठरणार नाही

 

रसिका जाधव

 

आज परीक्षा द्यावी अशी मानसिकता युवकांची नाही. तुम्ही त्यांच्यावर ते लादु नका? ही माझी भूमिका आहे. दुसरे त्यांना म्हणजे विद्यार्थी यांना आम्ही कोरोनाच्या सहानभूतीतून पास केले असा शेरा पण त्यांच्या मार्कमेमोवर नको. आमच्या हिताचे काय आहे यावर फोकस करा. आम्हाला घेवून राजकारण करू नका असे माझे मत आहे.

 

परमेश्वर इंगोले

 

सर्वोच्च न्यायालय यांनी तात्काळ याचिकेची दखल घेऊन लवकरात लवकर सुनावणी सुरू करून आपला निर्णय जाहीर करावा यामध्ये सद्यपरिस्थितीच भान न्यायालयीन यंत्रणांनी ठेवावं. मानवी आरोग्याचा मुद्दा सुद्धा लक्षात घ्यावा एखाद्याच्या निर्णयामुळे कुणाच्याही आरोग्याला धोका निर्माण होता कामा नये अगदी जगभरातील नामांकीत विद्यापीठांनी देखील परीक्षा रद्द केल्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने आणि केंद्र सरकारने विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा.

 

श्रीकांत जाधव

 

अतिशय योग्य भूमिका युवा सेनेने घेतली आहे. या भूमिकेला युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि अनेक विद्यार्थी संघटनांनी देखील पाठिंबा दिलेला आहे. आजच्या परिस्थितीत प्रत्येक दिवशी पाच हजारच्या पुढे कोरोना रुग्ण महाराष्ट्रात वाढत आहेत अशा परिस्थितीत केवळ राजकारणासाठी विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि युजीसी राजकारण करत असेल तर ते खुशाल करावं. पण काही बर वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण.

दौलत कणबरकर

जर परीक्षा घ्यायचीच आहे तर, प्रशासनाने आधी कोरोना कसा संपले  याकडे लक्ष देऊन नंतर परीक्षेचा निर्णय घ्यावा. कितीही झालं तरी  जीव महत्वाचा आहे. आणि जर या परिस्तिथीत परीक्षा घेतली गेली तर अनेक विद्यार्थी  परीक्षेपासून लांब राहतील.

प्रदिप  अडसुळे

कोरोनामुळं आजच्या घडीला परीक्षा घेणं योग्य नाही. हे अगदी बरोबर आहे. कारण परीक्षा घेत असताना सरकारच्या नियमाच पालन होणार नाही. परीक्षा घेतल्या तर युवकांच्या आरोग्याला धोका पोहचू शकतो, सर्वाना विश्वासात घेवून निर्णय घेतला पाहिजे.

 

शंभूराजे पाटील  

सर्व प्रथम केंद्र सरकार परीक्षा घेण्याचा आग्रह का धरत आहे, याची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. विद्यार्थ्यांची जबाबदारी कोण घेणार हे सुद्धा स्पष्ट करावे. परीक्षा घेणे महत्त्वाचे का आहे याचे कारण स्पष्ट केले पाहिजे. कुणाचा कुणाला ताळमेळ नाही असे दिसते.

        

अनिकेत  मोरे

यू.जी.सी. ने ही विद्यार्थ्यांचा योग्य विचार करूनच निर्णय दिलेला असेल. जर यु.जी.सी. चुकीची वाटत असेल तर आजपर्यंत आपण त्यांचे का ऐकत आलो?? आणि आपण आत्ता त्यांना डावलणार असेल तर हिथून पुढेही यु.जी.सी. चे ऐकणारच नाही अशी ही भुमीका असेल की नाही हेही सरकारने सांगावे. असे मला वाटतेय.

 

अभिलाष पटेल    

 

विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याबाबत केंद्राच्या आडमुठेपणाबाबत निषेध. परीक्षा जरी घेतल्या तरी लाखो विद्यार्थी, पर्यवेक्षक, पेपर तपासणी करणारे शिक्षक यांना कोरोना झाल्यास  केंद्र जबाबदारी घेईल का? त्यातच वैद्यकीय परीक्षांचे तर हॉल तिकीट ही आले आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख याबाबत भूमिका घेणार आहेत की नाही?   

 

 

गणेश स्वामी

 

आपल्या न्यायव्यवस्थेने अनेक महत्वपूर्ण असे निर्णय दिले आहेत. शिवसेना नेते तथा मंत्री आदित्य ठाकरे यांनी जी परिक्षा विरोधात रीट याचीका दाखल केली ती योग्यच आहे. कारण परीक्षा बाबत अनेकांची मत मतांतरे आहेत. शिवसेना तर बाजू मांडेलच पण राज्यातील उच्च तंत्र शिक्षण खात सुध्दा योग्य अशी बाजू आणि विद्यार्थी हिताची बाजू मांडेल यात काही शंका नाही. त्याच बरोबर येणारा निकाल हा निर्णय महाराष्ट्रातील विद्यार्थी यांच्या हिताचा तर देशातील लाखो विद्यार्थी यांना दिशा दर्शक ठरेल एवढे नक्की. 

  

यामुळे न्यायालयाने या संदर्भात सुनावणी घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही अपेक्षा.. जसे राजकीय पेच उद्भवल्यास न्यायालय कधीही उघडतात पण परिक्षा सुनावणी नियोजित वेळेत करुन निकाल द्यावा ही नम्र विनंती
                   

 

शिल्पा नरवडे

 

 

आजच्या काळामध्ये परीक्षेपेक्षाही विद्यार्थ्यांनचे जीवन हे खूप महत्वाचे आहे. कारण ते उद्याच्या काळाचे भावी नागरिक आहेत त्यामुळे त्यांच्यावर वारंवार मानसिक ताणतणाव लादू नये, अशी माझी भूमिका आहे.

 

दुसरे म्हणजे कोरोनाचा वाढता  प्रादुर्भाव लक्षात घेऊन सुद्धा  विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत वारंवार होत असलेले बदल आणि केंद्र सरकारच्या बुरसटलेल्या विचारांचा (निर्णयाचा) निषेध. मुख्य म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विद्यार्थ्यांनवर राजकारण करू नये या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांचे जीवन भरडले जात आहे. त्यामुळे दोन्ही सरकारने एकमताने विद्यार्थ्यांनच्या हिताचा निर्णय घेणे योग्य ठरेल उगाचच विनाकारण विद्यार्थ्यांनवर राजकारण करू नये असे मला वाटते.  कोरोनाच्या महामारीमध्ये परीक्षा जरी घेतल्या तरी विद्यार्थी पालकवर्ग आणि लोकसंख्या यांची जबाबदारी केंद्र सरकार घेणार का?

 

सद्या कोरोनाच्या महामारीचा विचार केला तर विद्यार्थ्यांना पास करून घेणेच त्यांच्या हिताचे ठरेल असे मला वाटते.

 

 

 लोकेश कांबळे

 

 आयुष्यात कधीही कल्पना केली नव्हती की, अश्या प्रकारे परस्थिती निर्माण होईल. समाजातील सर्वच घटक या जागतिक महामारिने भरडून निघाले आहेत. विद्यार्थी जो डोळ्यात उद्याची स्वप्न रंगवत भविष्य पाहत होता त्यांना ही या भयंकर संकटातून मार्गक्रमण करावे लागत आहे.

 

करोना हा संसर्गजन्य आजार (महामारी) असल्यामुळे जेवढा संपर्क टाळता येईल तेवढं चांगलं आहे. सुरुवातीला शासनाने या बाबत दिलासादायक निर्णय घेतला होता पण केंद्र सरकारने यात आडकाठी निर्माण केली आहे. या काळात फिजिकॅल प्रझेंट राहून परीक्षा देणं आरोग्याशी पोरखेळपणा करण्यासारखं आहे. पूर्वी पेक्षा आता महामारी प्रचंड वेगाने वाढत आहे.

 

परीक्षा न घेता सरसकट पास करण हाच उपाय सध्या तरी योग्य आहे. अन्यथा आपण होवून करो ना पसरण्यास मदत केल्यासारख वर्तन होईल. अपेक्षा आहे केंद्र सरकार आणि UGC या बाबत सकारात्मक निर्णय घेईल.

 

 

 

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News