ICSE बोर्डाच्या फेरपरीक्षांचं वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 24 September 2020

ICSE बोर्डाच्या फेरपरीक्षांचं वेळापत्रक जाहीर

काउन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CICSE) ने आयसीएसई (दहावी) व आयएससी (बारावी) च्या कंपार्टमेंट व श्रेणीसुधार परीक्षांच्या तारखा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच सीआयसीएसई बोर्डकडून ६ ते ९ ऑक्टोबरदरम्यान दहावी आणि बारावीच्या श्रेणीसुधार परीक्षा आयोजित करणात येणार असल्याची माहिती नुकतीच मंडळाने जाहीर केली आहे. ही परीक्षा संपल्यानंतर १७ ऑक्टोबरला विद्यार्थ्यांचा निकाला अधिकृतसंकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
 
विशेष म्हणजे आयसीएसई बोर्डानेकडून कंपार्टमेंट परीक्षेत नापास होणा-या विद्यार्थ्यांना सुध्दा पुढील उत्तीर्ण होण्याची संधी देण्यात येणार आहे. पण जे  विद्यार्थी आपल्या श्रेणीनुसार परीक्षेत यशस्वी होणार नाहीत, त्यांना गुण सुधारण्याची अजिबात संधी दिली जाणार नसल्याचे सुध्दा आयसीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे.
अशा होणार परीक्षा
 
- आयसीएसई कंपार्टमेंट परीक्षा २०२०: ६ ते ७ ऑक्टोबर
- आयसीएसई सुधार परीक्षा २०२०: ६ ते ९ ऑक्टोबर
- आयएससी कंपार्टमेंट परीक्षा २०२०: ६ ऑक्टोबर
- आयएससी सुधार परीक्षा २०२०: ६ ते ७ ऑक्टोबर
 
कोरोनाच्या काळात परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी संबंधीत कॉलेज प्रशासनाकडून कंबर कसली जात आहे. कारण महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी जिथं परीक्षा देणार आहेत. म्हणजे ज्या केंद्रावर जाणार आहेत. तिथं पोहचल्यापासून परीक्षा होईपर्यंत संपुर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षावर वेळेपूर्वीच पोहचावे. तसेच विद्यार्थीनी आपली काळजी म्हणून सोबत मास्क आणि सॅनिटाझर्स ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हॅंडगोल्ज असलं तर अति उत्तम असं सीआयसीएसई बोर्डाचे मुख्य कार्यकारी आणि सचिव गेरी अराथून यांनी सांगितलं.
 
जुलै महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल मंडळाने जाहीर केला होता. त्यानुसार दहावीत ९९.३४ टक्के तर बारावीत ९६.८४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News