नेहाच्या लग्नावर एक्स बॉयफ्रेंडने केलं असं वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 February 2020
  • काही दिवसांपासून नेहा कक्कर आणि गायक आदित्य नारायण यांच्या प्रेमसंबंधाच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. स्वतः आदित्यचे वडील उदित नारायण यांनी नॅशनल टेलिव्हिजन टीव्हीवर या दोघांच्या नात्याला संमती देऊन लग्नाची घोषणा केली होती.

मुंबई :  काही दिवसांपासून नेहा कक्कर आणि गायक आदित्य नारायण यांच्या प्रेमसंबंधाच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. स्वतः आदित्यचे वडील उदित नारायण यांनी नॅशनल टेलिव्हिजन टीव्हीवर या दोघांच्या नात्याला संमती देऊन लग्नाची घोषणा केली होती. येत्या १४ फेब्रुवारीला म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे' ला नेहा आणि आदित्यचं लग्न होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या लग्नाच्या चर्चा सगळीकडे होत आहेत. असे असतानाच नेहा कक्करचा एक्स बॉयफ्रेंडने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ती पोस्ट सगळीकडे व्हायरल होत आहे. या पोस्टचा संबंध नेहाच्या लग्नाशी असल्याचे सांगितले जात आहे. 

नेहा कक्कर आणि हिमांशू कोहली यांनी आपल्या नात्याची कबुली नॅशनल टेलिव्हिजनवर दिली होती. पण पुढील काही काळात त्यांच्यात झालेल्या गैरसमजुतीमुळे या दोघांनी आपल्या नात्याला पूर्णविराम दिला. पण त्याचा त्रास मात्र नेहा कक्कर झाला होता. आणि सोशल मीडियावर ती तिचं दुःख व्यक्त करताना दिसली. त्यानानंतर तिने आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करत आदित्य नारायणाला आपला जोडीदार म्हणून निवडलं. काही दिवसांपूर्वी नेहा आणि आदित्यचं 'गोवा बीच'हे गाणं प्रदर्शित झालं असून लवकरच हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. याच संदर्भात हिमांशूने ''कोणत्याही परिस्थिती आपण आनंदी राहायला पाहिजे, आपण स्वतःच काही गोष्टींचा विचार करतो आणि त्याचा शेवटही". हिमांशूने केलेल्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर नेहा आणि आदित्यच्या ठरलेल्या लग्नामुळे हिमांशू कोहली तणावाखाली असल्याच्या चर्चा रंगत आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News