कॉम्प्युटरवर सर्वाधिक काळ काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं हे वाचलंच पाहिजे 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019

डोळ्यांना आराम न देता  सतत कॉम्प्युटरकडे पाहिल्यानं डोळे लाल होणे, डोळ्यांची जळजळ होणं, अंधुक दिसणं यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात, तेव्हा कॉम्प्युटरवर सर्वाधिक काळ काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी या गोष्टी आवर्जुन करायला हव्या. 

डोळ्यांना आराम न देता  सतत कॉम्प्युटरकडे पाहिल्यानं डोळे लाल होणे, डोळ्यांची जळजळ होणं, अंधुक दिसणं यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात, तेव्हा कॉम्प्युटरवर सर्वाधिक काळ काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी या गोष्टी आवर्जुन करायला हव्या. 

आपले दिवसांतील किमान ८ ते १० तास हे कॉम्प्युटरवर काम करण्यात जातात. कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर सतत पाहत राहिल्यानं आपले डोळेही थकतात हे बहुतेकांना माहित नसतं. कामाचा ताण,  टार्गेट्स या सर्व गोष्टींमुळे आपल्या डोळ्यांनाही मध्ये मध्ये ब्रेकची गरज आहे हे आपण पूर्णपणे विसरून जातो. छोट्या पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यानं  डोळ्यांचं  आरोग्य हे बिघडू शकतं. 

- प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये डोळ्यांना त्रास होऊ नये यासाठी आय प्रोटेक्शन  फीचर असतं. ते आवर्जुन सुरू ठेवा.  तुमच्या डोळ्यांना त्रास होऊ नये यासाठी तुमच्या सोयीप्रमाणे स्क्रीनची ब्राइटनेस लेव्हल ठरवू शकता.
- अनेकदा आपण कॉम्प्युटर स्क्रीनकडे एकटक पाहतो अशा वेळी ज्या प्रमाणात डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप व्हायला पाहिजे तितकी होत नाही. त्यामुळे एका ठराविक वेळेनंतर या गोष्टींकडेही लक्ष द्या आणि ठरवून डोळ्यांची  उघडझाप करा. 
- खास कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या व्यक्तींसाठी वेगळा चष्मा तयार करून मिळतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानं नक्की अशाप्रकारचा चष्मा तुम्ही तयार करून घेऊ शकता. 
- योग्य आहाराचा डाएटमध्ये सहभाग करून घ्या. पालेभाज्या, अ जीवनसत्त्व असलेल्या  फळं, भाज्या यांचा आहारात नक्की समावेश करा. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News